Loading ...

मनाचे श्लोक २७

मनाचे श्लोक - श्लोक २७ - [Manache Shlok - Shlok 27] भवाच्या भये काय भीतोस लंडी, धरीं रे मना धीर धाकासि सांडी.

मनाचे श्लोक २७ | Manache Shlok 27

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक २७, भवाच्या भये काय भीतोस लंडी, धरीं रे मना धीर धाकासि सांडी

मनाचे श्लोक - श्लोक २७


भवाच्या भये काय भीतोस लंडी ।
धरीं रे मना धीर धाकासि सांडी ॥
रघूनायकासारिखा स्वामि शीरीं ।
नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी ॥ २७ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक २७ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


भवस्यास्य भीत्या मनः किं बिभेषि
जहीमां धियं धैर्यमेवावलंब्य ।
प्रभौ रक्षके रामचन्द्रे शिरःस्थे
भयं किं नु ते दण्डहस्तात् कृतान्तात् ॥ २७॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक २७ - अर्थ


या श्लोकात श्रीसमर्थ म्हणतात की, या प्रपंचातून येणाऱ्या अडी-अडचणींना, संकटांना घाबरतोस कशाला ? लंडी म्हणजे भित्रा. धीर धरुन या भीतीला सांडून दे. कारण भीतीचा त्याग झाल्यावरच माणूस स्वतंत्रपणे, मोकळेपणाने जगू शकतो. आणि त्यातही श्रीरामासारखा पाठीराखा असताना कशाची भीती आणि कशाची चिंता? हे समजवण्यासाठी समर्थ म्हणतात -

रघूनायकासारिखा स्वामि दाता ।
असोनी शिरीं वाहसी वेर्थ चिंता ।
नको वीसरों राघवा भूजकांता ।
नुपेक्षी नुपेक्षी कदा तूज भ्रांता ॥


मनाचे श्लोक २७ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषय सूची