Loading ...

मनाचे श्लोक २१

मनाचे श्लोक २१ - समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेले मनाचे श्लोक २१. मना वासना चूकवीं येरझारा, मना कामना सांडी रे द्रव्यदार [Manache Shlok 21].

मनाचे श्लोक २१ | Manache Shlok 21

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक २१, मना वासना चूकवीं येरझारा, मना कामना सांडी रे द्रव्यदारा

मनाचे श्लोक २१


मना वासना चूकवीं येरझारा ।
मना कामना सांडी रे द्रव्यदारा ॥
मना यातना थोर हे गर्भवासीं ।
मना सज्जना भेटवीं राघवासीं ॥ २१ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक २१ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


मनो जन्म-मृत्यु-प्रदां दुःखदात्रीं
धनाऽऽप्त-प्रिया-कामनां संत्यजाशु ।
यतो यातना गर्भवासेऽस्त्यसह्या
ततो राघवे प्रीतियोगं कुरुष्व ॥ २१ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक २१ - अर्थ


श्रीसमर्थ मनाला उपदेश करताना एक ओवी सांगत आहेत -

रामेविण जे जे आस ।
तितुकी जाणावी नैराश ।
माझें माझें सावकाश ।
सीण चि उरे ॥

श्रीरामाला विसरणे म्हणजे स्वतःला अडचणीत टाकणे होय. कारण देवाच्या विस्मरणानेच हातून असंख्य पापे घडत असतात.

जनाचा लालची स्वभाव ।
आरंभी च म्हणती देव ।
म्हणिजे मजला कांही देव ।
ऐसी वासना ॥

कांही च भक्ति केली नसतां ।
आणी इच्छिती प्रसन्नता ।
जैसें कांहीं च सेवा न करितां ।
स्वामीस मागती ॥

प्रस्तुत ओव्यांमध्ये सांगितल्या प्रमाणे जनाचा स्वभाव लालची असून, व्यर्थ भाषा बरळण्याचा आहे. आणि रघुनायकाची कुठल्याही प्रकारे सेवा न करता त्याच्याकडून फळाची अपेक्षा करणे, हे ही समाजाचे एक धोरण.

अभेदामाजी वाढवी भेदा ।
ते हे अहंता ॥

अजून एक शिकवण समर्थ आपल्याला देत आहेत. ते सांगतात, वाचेत नेहमी रामनाम असावे. अहंकार आपापसात भेद निर्माण करतो. त्यामुळे अहंकाररुपी पापाहून नेहमी दूर रहावे.


मनाचे श्लोक २१ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

तुमची टिप्पणी आमच्यासाठी महत्त्वाची आहे!
तुमचा अभिप्राय / टिप्पणी ही आम्ही कसे कार्य करतो? त्यातील सुधारणांसाठी आणि आम्ही सातत्याने उच्च-गुणवत्तेची सेवा प्रदान करतोय की नाही हे समजून घेण्यासाठी आमच्यासाठी महत्वाची आहे.

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची