दुधी भोपळ्याचा पराठा - पाककृती

दुधी भोपळ्याचा पराठा, पाककला - [Dudhi Bhopala Paratha, Recipe] दुधी भोपळा पौष्टिक असतो पण त्याची भाजी खायला आवडत नसल्याने त्याचा चटपटीत पराठा बनवून न्याहारीला, मधल्या वेळेत किंवा मुलांना डब्यात देता येतो.
दुधी भोपळ्याचा पराठा - पाककला | Dudhi Bhopala Paratha - Recipe

पौष्टिक आणि चटपटीत असलेला ‘दुधी भोपळ्याचा पराठा’

‘दुधी भोपळ्याचा पराठा’साठी लागणारा जिन्नस
 • ३०० ग्रॅम दुधी भोपळा
 • ३ वाट्या कणीक
 • १ चमचा तिखट
 • १/२ चमचा हळद
 • १ चमचा मीठ
 • २ चमचे धणे-जीरे पूड
 • १ चमचा गरम मसाला
 • ४ चमचे डालडयाचे मोहन

‘दुधी भोपळ्याचा पराठा’ची पाककृती
 • दुधी भोपळा किसुन घ्यावा. पाणी पिळून बाजूला काढून ठेवावा.
 • परातीत कणीक घेऊन त्यात किसलेला दुधी, तिखट, हळद, धणे-जीरे पूड, गरम मसाला, डालडयाचे मोहन आणि चवीनुसार मीठ टाकून सर्व एकत्र करुन पीठ भिजवावे. पीठ घट्ट असावे.
 • जरुर वाटल्यास भोपळ्याचेच काढलेले पाणी वापरावे.
 • नंतर त्याचे फुलक्याएवढे परोठे करुन दोन्ही बाजूने शेकावेत व बाजूने तूप सोडावे. गरमा गरम दुधी भोपळ्याचा पराठा दही किंवा चटणीसोबत सर्व्ह करावा.
स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा


जीवनशैली        पाककला

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.