Loading ...

चणाडाळ मुगडाळ स्टफ पराठा (पाककृती)

चणाडाळ मुगडाळ स्टफ पराठा, पाककृती - [Chanadal Mugdal Stuff Paratha, Recipe] न्याहारीला आणि डब्याला चटपटीत व पौष्टिक पदार्थ चणाडाळ मुगडाळ स्टफ पराठा.

चणाडाळ मुगडाळ स्टफ पराठा- पाककला | Chanadal Mugdal Stuff Paratha - Recipe

रोजच्या पराठ्यापेक्षा वेगळा असा चटपटीत आणि पौष्टिक पदार्थ चणाडाळ मुगडाळ स्टफ पराठा


चणाडाळ मुगडाळ स्टफ पराठा (पाककृती) - (Chanadal Mugdal Stuff Paratha Recipe) रोजच्या पराठ्यापेक्षा वेगळा आणि अतिशय पौष्टिक असा ‘चणाडाळ मुगडाळ स्टफ पराठा’ न्याहारी म्हणून किंवा मधल्या वेळेत खाल्ला जाऊ शकतो. तसेच मुलांना शाळेत डब्याला देता येऊ शकतो.

Chanadal Mugdal Stuff Paratha is a different kind of paratha which is eat for breakfast or in a tiffin. It is very healthy and tasty food.



चणाडाळ मुगडाळ स्टफ पराठा करण्यासाठी लागणारा जिन्नस


  • १/२ भिजवलेली चणाडाळ
  • १/२ वाटी भिजवलेली मुगडाळ
  • १ चमचा आलं लसूण पेस्ट
  • १/२ चमचा तिखट
  • मीठ चवीनुसार
  • १/२ चमचा हळद
  • २ मोठे चमचे बारीक चिरलेली कोथींबीर
  • १ चमचा लिंबाचा रस
  • १ चमचा साखर
  • १ वाटी कणिक
  • पाव वाटी मैदा
  • पाव चमचा ओवा
  • १ चमचा तेलाचे मोहन

चणाडाळ मुगडाळ स्टफ पराठा करण्यासाठी लागणाऱ्या सारणाची पाककृती


  • एका कढईत १ मोठा चमचा तेल तापवून घ्यावे.
  • तापलेल्या तेलात पाव चमचा मोहरी घालावी.
  • मोहरी तडतडली की त्यामध्ये हिंग, आलं - लसूण पेस्ट टाकून लगेच मुगाची व चण्याची जाडसर वाटून घेतलेली डाळ टाकावी.
  • डाळींचे मिश्रण टाकल्यावर मिश्रण व्यवस्थित परतून घ्यावे.
  • आता यामध्ये हळद, तिखट, चवीनुसार मीठ व साखर टाकून मिक्स करावे.
  • मिक्स झाले की झाकण ठेवून शिजू द्यावे.
  • व्यवस्थित शिजल्या गेले की त्यात लिंबाचा रस व कोथिंबीर घालून मिक्स करावे आणि सारण थंड करायला ठेवून द्यावे.

चणाडाळ मुगडाळ स्टफ पराठा करण्याची पाककृती


  • सर्वप्रथम दोन्ही डाळी मिक्सरवर जाडसर वाटून घ्याव्यात.
  • एका बाऊलमध्ये मैदा, कणीक घ्यावे.
  • पीठात चिमूटभर मीठ, ओवा, तेलाचे मोहन टाकून घट्टसर गोळा मळावा.
  • तयार गोळा १० मिनिटे झाकून ठेवावा.
  • आता भिजलेल्या कणकेचा पुरीएवढा गोळा घेऊन थोडा पोळपाटावर लाटून घ्यावा.
  • पुरीमध्ये तयार सारण भरावे.
  • हलक्या हाताने सर्व बाजू बंद कराव्यात.
  • पोळापाटावर कणीक भुरभुरून त्यावर भरलेला गोळा ठेवून हलक्या हाताने लाटावा. शक्यतो पराठा फुटू देऊ नये.
  • तव्यावर दोन्ही बाजूस थोड्या शेकल्या गेल्या की (भाजल्या) पराठ्याला दोन्ही बाजूने तेल किंवा लोणी किंवा तूप लावून खरपूस भाजून घ्यावे.
  • डीशमधे काढून त्याचे चार भाग करावे.
  • लोण्याबरोबर किंवा सॉसबरोबर शाळेच्या डब्यात यम्मी चणाडाळ मुगडाळ स्टफ पराठा मुलांना द्यावा.

टीप:


पराठा फुटण्याची जर भीती वाटत असेल तर दोन लहान पोळ्या लाटून एका पराठ्यावर वरील सारण थोडे (लागेल तसे) पसरविणे व त्यावर दुसरी पोळी ठेवून एका पहिल्या पोळीला बाजूने पाणी लावणे सर्व कडा व्यवस्थित बंद करून हलक्या हाताने लाटून मग हा पराठा तव्यावर टाकणे या पद्धतीने पराठा केल्यास फुटण्याची भीती फार कमी असते.




स्वाती खंदारे | Swati Khandare
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.


जीवनशैली        पाककला

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची