Loading ...

चटपटीत आलू (पाककृती)

चटपटीत आलू, पाककृती - [Chatpatit Aloo, Recipe] तोंडाला पाणी आणणारा मधल्या वेळेत तसेच मुलांना शाळेच्या डब्याला देता येणारा पदार्थ चटपटीत आलू.

चटपटीत आलू- पाककला | Chatpatit Aloo - Recipe

तोंडाला पाणी आणणारा पदार्थ चटपटीत आलू


चटपटीत आलू (पाककृती) - (Chatpatit Aloo Recipe) आपल्याकडे चाट आवडत नाही असा कोणी सापडणार नाही, त्यासाठी वेगवेगळे प्रकारचे चाट बनवले जातात. आज आपण मधल्या वेळेसाठी किंवा शाळेच्या डब्याला मुलांना एक वेगळा चाटचा पदार्थ ‘चटपटीत आलू’ करून देऊ शकतो.

Chaat is the most famous street food items in All over India. Not only elders but also children also enjoy this Chaat. Today we are going to make a mouth-watering Chatpatit Aloo.



चटपटीत आलू करण्यासाठी लागणारा जिन्नस


  • १/२ किलो बटाटे (छोटे)
  • २ चमचे लसूण पेस्ट
  • २ चमचे आलं पेस्ट
  • १ मोठी शिमला मिरची बारीक कापलेली
  • १ चमचा मैदा
  • १ चमचा कॉर्न फ्लॉवर
  • १ चमचा टोमॅटो सॉस
  • १/२ चमचा अजिनोमोटो
  • मीठ चवीनुसार

चटपटीत आलू करण्याची पाककृती


  • प्रथम एका बाऊलमध्ये कॉर्न फ्लॉवर, मैदा, अजिनोमोटो, मीठ पाणी घालून पेस्ट तयार करून घ्या.
  • छोट्या बटाट्यांचे सालं काढून सुरीने चिरा मारून घ्या.
  • चिरा मारल्यानंतर वरील तयार पेस्टमध्ये घालून चांगले मिक्स करा.
  • गॅसवर कढईत तेल तापवून घ्या.
  • तेल तापल्यावर पेस्टमध्ये बुडवलेले बटाटे मध्यम आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या.
  • आता एका दुसऱ्या पॅनमध्ये १ चमचा तेल गरम करून घ्या.
  • तेल गरम झाल्यावर त्यामध्ये आलं-लसूण पेस्ट, बारीक कापलेली शिमला मिरची परतून घ्या.
  • परतल्यावर त्यामध्ये टोमॅटो सॉस, चवीनुसार मीठ, अजिनोमोटो घालून २ मिनिटं शिजू द्या.
  • मिश्रण शिजल्यावर तळलेले बटाटे त्यात घालून परतून घ्या.
  • व्यवस्थित परतल्यावर वरुन बारीक चिरलेल्या पातीचा कांदा वर घालून गरम गरम सर्व्ह करा.



स्वाती खंदारे | Swati Khandare
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.


जीवनशैली        पाककला

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची