Loading ...

मनाचे श्लोक - श्लोक ३५

मनाचे श्लोक - श्लोक ३५ - [Manache Shlok - Shlok 35] असे हो जया अंतरी भाव जैसा, वसे हो तया अंतरी देव तैसा.

मनाचे श्लोक - श्लोक ३५ | Manache Shlok - Shlok 35

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक ३५, असे हो जया अंतरी भाव जैसा, वसे हो तया अंतरी देव तैसा

मनाचे श्लोक - श्लोक ३५


असे हो जया अंतरी भाव जैसा ।
वसे हो तया अंतरी देव तैसा ॥
अनन्यास रक्षीतसे चापपाणी ।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३५ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ३५ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


हृदि स्वे स्थितो यादृशो यस्य भावो
वसत्यञ्जसा तादृशस्तत्र देवः ।
अनन्यस्य यो रक्षकश्चापपाणिः
स नोपेक्षते रामचन्द्रः स्वभक्तम् ॥ ३५ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ३५ - अर्थ


श्रीसमर्थ या श्लोकातून बोध करून देतात की, देवाच्या प्रती जसा भाव असेल, त्याच भावा प्रमाणे देव आपल्या हृदयात वसतात.

जया अंतरी भाव होईल जैसा ।
तयालागि तो देव पावेल तैसा ॥

वास्तविक पाहता श्रीरामाने भक्ताची कधीही उपेक्षा केलेली नाही पण मनाचा तसा निश्चयच होत नाही, याला काय करावे!

किंवा

मनीं भावना भक्ती लोकांसि जैसी ।
तयासारिखी देवरायासी तैसी ॥

किंवा

जैसे जयाचें भजन ।
तैसा चि देव हि आपण ।
म्हणौन हें आवघें जाण ।
आपण चि पासीं ॥

अनन्यतेने शरण येऊन भक्ती करत असलेल्या भक्ताची श्रीरामाने कधी उपेक्षा केल्याचे एकही उदाहरण नाही. राम त्याचे सर्व विघ्नांपासून रक्षण करतो.

च्यारीदेह निरसावे ।
साधकें देहातीत व्हावें ।
देहातीत होतां जाणावे ।
अनन्य भक्त ॥

किंवा

सदा सर्वदा देव दासाभिमानी ।
कृपा भाकितां सीघ्र पावे निदानीं ।
तया अंतरी थोर लाहान नाहीं ।
परी पाहिजे दृढ भावार्थ कांही ॥


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची