Loading ...
/* Dont copy */

मनाचे श्लोक - श्लोक ३६

मनाचे श्लोक - श्लोक ३६ - [Manache Shlok - Shlok 36] सदा सर्वदा देव सन्नीध आहे, कृपाळुपणे अल्प धारीष्ट पाहे.

मनाचे श्लोक - श्लोक ३६ | Manache Shlok - Shlok 36

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक ३६, सदा सर्वदा देव सन्नीध आहे, कृपाळुपणे अल्प धारीष्ट पाहे

मनाचे श्लोक - श्लोक ३६


सदा सर्वदा देव सन्नीध आहे ।
कृपाळुपणे अल्प धारीष्ट पाहे ॥
सुखानंद आनंद कैवल्यदानी ।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३६ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ३६ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


हरिः प्राणिनां संनिधौ सर्वदाऽऽस्ते
कृपालुः स्वभक्तस्य धैर्यं विलोक्य ।
सुखानंद-कैवल्य-दाताऽस्ति यो वै
स नोपेक्षते रामचन्द्रः स्वभक्तम् ॥ ३६ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ३६ - अर्थ


श्रीसमर्थ येथे आपल्याला सांगत आहेत की, देव सदा सर्वकाळ आपल्याच जवळ निवास करत असतो. फक्त आपल्या हृदयातील भाव तेवढा प्रबळ नसल्याने आणि दृष्टी अस्वच्छ असल्या कारणाने तो पावताना दिसत नाही. जसा भाव, तसा देव!

बहु काळ गेले देवासी धुंडितां ।
देव पाहों जातां जवळी च ॥

जवळी च असे ।
पाहातां न दिसे ।
सन्नीध चि वसे रात्रदिस ॥

रात्रदिस देव बाह्यआभ्यांतरी ।
जीवा क्षणभरी विसंभेना ॥

विसंभेना परी जीव हे नेणती ।
जाती अधोगती म्हणोनीयां ॥

निसर्गाच्या नियमाप्रमाणे, या जगात कुठलीही गोष्ट फुकटात मिळत नाही. मग ती परमेश्वर प्राप्ती का असेना. एखादं कार्य करण्यासाठी आपल्या हृदयात त्याची तळमळ असेल आणि आपण कष्टाचं पहिलं पाऊल टाकलं तर, पुढची शंभर पाऊले टाकण्यास देव स्वतः आपल्याला सहाय्य करतो. हेच तत्त्व इथे मांडून समर्थ आपल्याला सांगतात की, जर राम हवा असेल तर त्यासाठी आधी आपण स्वतः प्रयत्न केले पाहिजे. राम स्वतः येऊन आपल्या डोक्यावर हात ठेवणार नाही. आणि यासाठी आपण किती प्रयत्नशील आहोत, आपण किती धैर्यशील आहोत, हे कृपाळूपणे श्रीराम बघत आहे! आपण एक पाऊल टाकावं की राम पुढचं सर्व बघून घेईल, कारण तो फार दयाळू आहे.

मातेचें हृदय कोमळ ।
नोळखोनी भयभीत बाळ ।
तेवी श्रीराम कृपाळ ।
भक्तपरीक्षा आरंभी ॥

संकटामागें संकट ।
येतां धैर्य धरी चोखट ।
तरी भक्तासी दीर्घ काळ वाट ।
पाहणें नलगे ॥

ऐसा कृपाळु देवाधिदेव ।
पाहे शरणागताचा भाव ।
परी हेतु तद्रक्षणीं सर्व ।
मातेपरी मुळीहुनी ॥

माय बाप रामराया ।
ज्यातें दास नित्य गाय ।
ते चि धरी घट्ट पाय ।
आलिया रे ॥

श्रीराम सुखानंद स्वरुप असून कैवल्य प्रदान करणारा म्हणजे मोक्ष देणारा आहे, हा बोध समर्थ आपल्याला करुन देत आहेत.


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची