Loading ...

मनाचे श्लोक - श्लोक ३७

मनाचे श्लोक - श्लोक ३७ - [Manache Shlok - Shlok 37] सदा चक्रवाकासि मार्तंड जैसा, उडी घालितो संकटी स्वामि तैसा.

मनाचे श्लोक - श्लोक ३७ | Manache Shlok - Shlok 37

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक ३७, सदा चक्रवाकासि मार्तंड जैसा, उडी घालितो संकटी स्वामि तैसा

मनाचे श्लोक - श्लोक ३७


सदा चक्रवाकासि मार्तंड जैसा ।
उडी घालितो संकटी स्वामि तैसा ॥
हरीभक्तिचा घाव गाजे निशाणी ।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३७ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ३७ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


यथा भास्करश्चक्रवाकस्य गोप्ता
तथा संकटेऽस्ति प्रभुः सेवकस्य ।
हरेर्भक्तिमाहात्म्यमुद्गीयते ज्ञैः
स नोपेक्षते रामचन्द्रः स्वभक्तम् ॥ ३७ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ३७ - अर्थ


मार्तंड म्हणजे सूर्य. श्रीसमर्थ यासंबंधी चक्रवाक पक्षाची एक कथा सांगतात -

चक्रवाक पक्षाची कथा अशी आहे की, हा पक्षी बहुधा एकटा नसतो. नर आणि मादी बरोबर असतात. योग असा येतो की, एखाद्या विस्तृत नदीच्या दुसऱ्या तीरावर नर गेलेला असतो व मादी अलिकडच्या तीरावरच असता सूर्य मावळतो. मग इकडून मादीने ओरडायचे व तिकडून नराने ओरडायचे. अशा रीतीने सारी रात्र ते नरमादी विरहात कंठीत असतात. प्रातःकाळी सूर्य उदयास येऊन त्यांच्या विरहदुःखाचे जसे हरण करतो, अगदी त्याच प्रमाणे भक्त संकटात आहे हे समजताच श्रीसद्गुरू/श्रीभगवंत भक्ताला त्या संकटातून सोडवण्यासाठी धावून येतात.

निस्साण म्हणून नगाऱ्यासारखे एक वाद्य आहे. तसा अर्थ घेतला तर ‘नगाऱ्यावर हरिभक्तीचे टिपरू सारखे वाजत आहे’ असा या चरणाचा अर्थ होईल. पण निशाण या शब्दाचा तसा काही अर्थ येथे नसला तर ‘हरिभक्तीचे निशाण प्रगट रीतीने सारखे फडकत आहे’ असा अर्थ करावा.

प्रगट रामाचें निशाण ।
आत्माराम ज्ञानधन विश्वंभर विद्यमान ।
भाग्यें कळे ॥

कदा काळीं राम दासां उपेक्षीना ।
रामउपासना ऐसी आहे ॥

या ओवी प्रमाणे श्रीराम भक्ताची कधीही उपेक्षा करत नाही, हे सत्य समर्थ आपल्याला येथे सांगत आहेत.


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची