Loading ...
/* Dont copy */

मटार कचोरी - पाककृती

मटार कचोरी, पाककला - [Mutter Kachori, Recipe] न्याहारी किंवा मधल्या वेळेत खाता येईल अशी चटपटीत मटार कचोरी घरच्या घरी बनवा.

मटार कचोरी - पाककला | Mutter Kachori - Recipe

मधल्या भुकेसाठी चटपटीत ‘मटार कचोरी’

‘मटार कचोरी’साठी लागणारा जिन्नस

  • २ वाट्या मैदा
  • १ वाटी बारीक रवा
  • १ किलो मटार
  • थोडीशी कोथिंबीर
  • ३ - ४ चमचे काजू अणि किसमीस
  • १०० ग्रॅम ओलं खोबरं किंवा सुकं खोबरं
  • २५ ग्रॅम खसखस
  • १/२ चमचा लाल तिखट
  • ४ - ५ हिरव्या मिरच्या
  • १/२ चमचा हळद
  • १ चमचा गोडा मसाला
  • १ चमचा काळा मसाला
  • मीठ चवीनुसार
  • २ चमचे लिंबाचा रस
  • १/२ चमचा साखर
  • १ चमचा जीरे पावडर
  • १ चमचा धणे पावडर

‘मटार कचोरी’ची पाककृती

  • प्रथम परातीत २ वाट्या मैदा घेवून त्यात १ वाटी बारीक रवा व ५ - ६ चमचे तेल व चवीपूरत मीठ घालून घट्ट भिजवून २ - ३ तास बाजूला ठेवा.
  • नंतर मटार सोलून मिक्सर मधून थोडे जाडसर वाटून घ्या.
  • त्यात ४ - ५ हिरव्या मिरच्या घालून बारीक करा.
  • नंतर एका कढईत ४ - ५ चमचे तेल गरम करुन मोहरी, जीरे घाला.
  • नंतर त्यात भाजलेले खोबरे(किस) घालून थोडं परतून घ्या.
  • त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर व हळद, तिखट, काळा मसाला, गोडा मसाला, धणे पावडर व जीरे पावडर घालून परता.
  • परतल्यावर त्यात मटारची भरड घाला व चांगले मिसळून घ्या.
  • नंतर त्यात काजू, किसमीस घालून व आवडीनुसार साखर व चवीपूरते मीठ घाला.
  • आता सारण तयार आहे.
  • पिठाच्या गोल पुर्‍या लाटून त्यात मटार सारण घालून त्या बंद करून चपटे वडयासारखे बनवा.
  • कढईत तेल गरम करुन तयार कचोरी गुलाबी होईपर्यंत तळून घ्या.
  • स्वादिष्ट मटार कचोरी तयार.
गरम गरम मटार कचोरी चिंचेच्या किंवा पुदीनाच्या चटणीबरोबर सर्व्ह करा.
स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा

जीवनशैली / पाककला


अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची