झटपट घरी बनवता येणारी चटपटीत टोमॅटोचा मसाला डोसा
‘टोमॅटोचा मसाला डोसा’साठी लागणारा जिन्नस
- १२५ ग्रॅम मैदा
- १ अंडे
- १ मोठा टोमॅटो
- २-३ हिरव्या मिरच्या
- १ १/२ कप दूध
- १/४ चमचा मीठ
- थोडेसे किसलेले चीझ
‘टोमॅटोचा मसाला डोसा’ची पाककृती
- मैदा व मीठ एकत्र करुन त्यात अंडी फोडून घालावीत व दूध घालून पीठ भिजवून ठेवावे.
- जरुर वाटल्यास थोडेसे पाणी घालावे. अर्धा तास पीठ भिजवून ठेवावे.
- टोमॅटो बारीक चिरावेत. चीझ किसून घ्यावे.
- नंतर टोमॅटो, मीठ, बारीक चिरलेल्या मिरच्या व चीझ एकत्र करुन ठेवावे.
- सपाट तव्याला तेल किंवा तूप लावून त्यावर कपाने पीठ ओतून डोसा घालावा. झाकण ठेवू नये.
- डोसा शिजला की बाजूने तेल सोडून जरा कुरकुरीत करावा.
- मध्यभागी टोमॅटोचे थोडेसे मिश्रण भरुन डोशाप्रमाणे घडी घालावी व गरमगरम सर्व्ह करावा.
- टोमॅटोचा मसाला डोसा चवीला फार छान लागतो.
स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
जीवनशैली / पाककला
- [col]
- महाराष्ट्रीय पदार्थ
न्याहारीचे पदार्थ
आमट्या,सार,कढी
कोशिंबीर,सलाड,रायते
पोळी भाकरी
भाज्या - उपवासाचे पदार्थ
पौष्टिक पदार्थ
पथ्यकर पदार्थ
मसाले
चटण्या
लोणची - मधल्या वेळचे पदार्थ
सरबते व शीतपेये
पुडिंग
आईस्क्रीम
बेकिंग
गोड पदार्थ - भाताचे प्रकार
मांसाहारी पदार्थ
वाळवणाचे पदार्थ
सणासुदीचे पदार्थ
दिवाळी फराळ
पाककृतींचे व्हिडीओ