Loading ...

रव्याचे लाडू - पाककृती (स्वाती खंदारे)

रव्याचे लाडू (पाककला) - सणासुदीला खासकरुन दिवाळीमध्ये केले जाणारे गोड रव्याचे लाडू [Ravyache Ladoo Recipe].

रव्याचे लाडू - पाककृती (स्वाती खंदारे)

खासकरुन दिवाळीमध्ये केले जाणारे गोड ‘रव्याचे लाडू’


रव्याचे लाडू - पाककृती (स्वाती खंदारे)

(Ravyache Ladoo Recipe) सणासुदीला खासकरुन दिवाळीमध्ये केले जाणारे गोड ‘रव्याचे लाडू’ तुम्ही इतर वेळीही बनवून मुलांना पटकन खाण्यासाठी देवू शकता.



रव्याचे लाडू करण्यासाठी लागणारा जिन्नस


  • ४ वाट्या बारीक रवा
  • दीड वाटी तूप किंवा डालडा
  • ४ वाट्या साखर
  • १ नारळ
  • ५ - ६ वेलदोडे पूड
  • बेदाणा व काजूचे काप (ऐच्छिक)

रव्याचे लाडू करण्याची पाककृती


  • रवा चाळून घ्यावा. नारळ खवून पांढरे खोबरे घ्यावे. करवंटीजवळचा काळसर भाग वेगळा खरवडावा व त्याचा उपयोग भाजी, आमटीसाठी करावा.
  • जाड बुडाच्या पातेल्यात तूप तापले की मध्यम आचेवर रवा घालून भाजावा.
  • सुमारे पंधरा मिनिटांनंतर रवा भाजत आला की त्यात खोबरे घालून आणखी पाच मिनिटे भाजावे व खाली उतरवून मिश्रण ताटात ओतावे.
  • दुसऱ्या पातेल्यात साखर घालून त्यात दोन वाट्या पाणी घालावे व चुलीवर ठेवावे.
  • उकळी आली की तीन चमचे दूध घालावे व आच कमी करावी. मळी येईल ती काढून टाकावी.
  • पाक उकळून ठेवावा. एकतारी पाक झाला की रव्याचे मिश्रण त्यात घालावे.
  • दोन मिनिटे चुलीवर ठेवून खाली उतरवावे व झाकून ठेवावे. त्यात वेलदोडे पूड, मेवा घालून दर पाच - दहा मिनिटांनी मिश्रण ढवळावे.
  • मिश्रण कोमटसर झाले व लाडू वळण्याइतपत आळले की लहान लहान लाडू वळावे.
  • दुसऱ्या दिवशी मुरल्यानंतर खायला द्यावे.

ओला नारळ वापरल्यामुळे रव्याचे लाडू चार दिवसानंतर फ्रिजमध्ये ठेवावे. नाहीतर लाडवांना खवट वास येऊ लागतो.


स्वाती खंदारे | Swati Khandare
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.


सर्व विभाग / जीवनशैली / पाककला


अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची