झटपट घरी बनवता येणारा खमंग, चटपटीत ब्रेड रोल्स
‘ब्रेड रोल्स’साठी लागणारा जिन्नस
- स्लाईस ब्रेड
- उकडलेले बटाटे
- मीठ
- हिरव्या मिरच्या
- कोथिंबीर
- थोडे आले
- तळण्यासाठी तूप किंवा तेल
‘ब्रेड रोल्स’ची पाककृती
- ब्रेडच्या कड्या कापून घ्या. उकडलेले बटाटे सोलून घ्या. नंतर किसणीवर किसा.
- त्यात वाटलेल्या मिरच्या, आले व मीठ घालावे. थोडी कोथिंबीर घालून सारण तयार करावे.
- उथळ पातेलीत पाणी घेवून त्यात एकेक स्लाईस टाकाव्यात.
- नंतर दोन्ही हाताच्या तळव्याने दाबून पाणी काढून टाकावे. त्यावर सारण घालून गुंडाळी करावी. कडा बंद कराव्यात.
- ब्रेड ओला झाल्यामुळे छान गुंडाळी होते. नंतर कढईत तूप टाकून त्यात हे रोल्स तळून काढावेत.
- ब्रेड रोल्स छान कुरकुरीत होतात.
- गरमागरम ब्रेड रोल्स सॉस सोबत सर्व्ह करावेत.
स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
जीवनशैली / पाककला
- [col]
- महाराष्ट्रीय पदार्थ
न्याहारीचे पदार्थ
आमट्या,सार,कढी
कोशिंबीर,सलाड,रायते
पोळी भाकरी
भाज्या - उपवासाचे पदार्थ
पौष्टिक पदार्थ
पथ्यकर पदार्थ
मसाले
चटण्या
लोणची - मधल्या वेळचे पदार्थ
सरबते व शीतपेये
पुडिंग
आईस्क्रीम
बेकिंग
गोड पदार्थ - भाताचे प्रकार
मांसाहारी पदार्थ
वाळवणाचे पदार्थ
सणासुदीचे पदार्थ
दिवाळी फराळ
पाककृतींचे व्हिडीओ