भेळ पोहे - पाककृती

भेळ पोहे, पाककला - [Bhel Pohe, Recipe] नेहमीच्या पोह्यामध्ये बदल म्हणजे चटपटीत, भेळेसारखे लागणारे भेळ पोहे मुलं आवडीने खातील.
भेळ पोहे - पाककला | Bhel Pohe - Recipe

झटपट घरी बनवता येणारी चटपटीत भेळ पोहे

‘भेळ पोहे’साठी लागणारा जिन्नस

 • ५-६ वाट्या पातळ पोहे
 • १२५ ग्रॅम खारे शेंगदाणे
 • ५० ग्रॅम शेव
 • ३-४ हिरव्या मिरच्यांचे तुकडे
 • अर्धे लिंबू
 • २ मध्यम कांदे
 • थोडी कोथिंबीर
 • खोबरे
 • साखर
 • मीठ
 • तुप
 • हिंग
 • जीरे

‘भेळ पोहे’ची पाककृती

 • तुपामध्ये हिंग-जीरे घालून फोडणी करावी. (हळद घालू नये.)
 • फोडणीत पोहे घालून मंदाग्नीवर परतावेत.
 • चांगले कुरकुरीत झाले की उतरावेत.
 • कांदा बारीक चिरावा. नंतर खारे शेंगदाणे, शेव, हिरव्या मिरच्यांचे तुकडे, कोथिंबीर, खोबरे, साखर आणि चवीनुसार मीठ घालून एकत्र करुन भेळेसारखे कालवावे. वरून लिंबू पिळावे. चटपटीत भेळ पोहे तयार.

भेळ पोहे चवीला अतिशय सुंदर लागते. चुरमुरे न मिळाल्यास पोहे वापरुन भेळ करावी.

स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा


जीवनशैली        पाककला

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.