जय देव जय देव जय पांडुरंगा, दीपारती ओवाळू तुजला जिवलगा
जय देव जय देव जय पांडुरंगा ॥दीपारती ओवाळू तुजला जिवलगा ॥ ध्रु० ॥
स्वयंप्रकाशा तुझी सर्वही दीप्ती ॥
पूर्णानंद प्राप्त करिता तव भक्ती ॥
देहत्रय वाती पाजळोनी प्रीती ॥
ओवाळितो प्रेमे देवा तुजप्रती ॥ जय० ॥ १ ॥
देवा तुज पाहता येतो प्रेमपूर ॥
नाम निरंतर गाता होतो भव पार ॥
वाटे तव भक्ती ही मोठी प्रियकर ॥
विष्णुदासा देई अखंड हा भर ॥ जय० ॥ २ ॥