२० एप्रिल दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० एप्रिल २०१८
२० एप्रिल दिनविशेष | April 20 in History
ॲडॉल्फ हिटलर. छायाचित्र: मराठीमाती डॉट कॉम आर्काईव्ह.

ॲडॉल्फ हिटलर - (२० एप्रिल १८८९ - ३० एप्रिल १९४५) हे जर्मनी देशाचा जर्मन हुकूमशहा होते. हिटलर हे एक महत्त्वाकांक्षी तसेच मुत्सद्दी नेता होते. ‘एक राष्ट्र, एक आवाज, एक नेता, एक ध्वज’ हे त्यांचे घोष वाक्य होते.

जागतिक दिवस


 • -

ठळक घटना/घडामोडी


 • १६५७: न्यूयॉर्कमधील ज्यू व्यक्तिंना धर्मस्वातंत्र्य देण्यात आले.
 • १७७०: जेम्स कूकच्या तांड्याला सर्वप्रथम ऑस्ट्रेलियाचा किनारा दिसला.
 • १७९२: फ्रांसने ऑस्ट्रियाविरुद्ध युद्ध पुकारले.
 • १८३६: अमेरिकेत विस्कॉन्सिन प्रांताची निर्मिती.
 • १८६१: अमेरिकन यादवी युद्ध - उत्तरेच्या सेनापती रॉबर्ट ई. लीने राजीनामा देउन व्हर्जिनीयाचे सेनापतीपद घेतले.
 • १८६२: लुई पास्चर व क्लॉड बर्नार्डने पास्चरायझेशनचा प्रयोग केला.
 • १८७६: बल्गेरियात उठाव.
 • १८८४: पोप लिओ तेराव्याने ह्युमेनम जीनसचे प्रकाशन केले व त्याद्वारे मानवाचे पृथ्वीवरील वास्तव्याचे कारण समजावयाचा प्रयत्न केला.
 • १९१४: लडलोची कत्तल - अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यात संपकर्‍यांविरुद्ध सोडलेल्या गुंडांनी १७ स्त्री, पुरुष व मुलांना ठार केले.
 • १९४५: दुसरे महायुद्ध - अमेरिकन सैन्याने जर्मनीचे लीपझीग शहर काबीज केले.
 • १९६७: स्वित्झर्लंडचे विमान कॅनडाच्या टोरोंटो शहराजवळ कोसळले. १२६ ठार.
 • १९६८: साउथ आफ्रिकन एरवेझचे बोईंग ७०७ जातीचे विमान विंडहोक शहराजवळ कोसळले. १२२ ठार.
 • १९६८: पिएर त्रूदो कॅनडाच्या पंतप्रधानपदी.
 • १९७२: अंतराळयान अपोलो १६ चंद्रावर उतरले.
 • १९७८: सोवियेत संघाच्या लढाउ विमानांनी कोरियन एर फ्लाइट ९०२ या बोईंग ७०७ जातीच्या विमानावर क्षेपणास्त्रे सोडली. २ ठार. वैमानिकांनी कुशलतेने विमान गोठलेल्या तळ्यावर उतरवले.
 • १९९८: एर फ्रांसचे बोईंग ७२७ जातीचे विमान कोलंबियाच्या बोगोटा विमानतळावरून उडल्यावर डोंगरावर कोसळले. ५३ ठार.
 • १९९९: कॉलोराडोच्या लिटलटन शहरात एरिक हॅरिस व डिलन क्लेबोल्डने आपल्या कोलंबाइन हायस्कूल या शाळेतील १२ विद्यार्थी व १ शिक्षकाला ठार मारले व नंतर आत्मह्त्या केली.
 • २००४: युटिका, इलिनॉय शहरात एफ. ३ टोर्नेडो. ८ ठार.
 • २००४: इराकच्या अबु गरीब तुरुंगावर हल्ला. २२ कैदी ठार. ९२ जखमी.

जन्म/वाढदिवस


 • १६३३: गो-कोम्यो, जपानी सम्राट.
 • १८०८: नेपोलियन तिसरा, फ्रांसचा सम्राट.
 • १८८९: ॲडॉल्फ हिटलर, जर्मन हुकुमशहा.
 • १९१४: गोपीनाथ मोहांती, उडिया लेखक.
 • १९३९: ग्रो हार्लेम ब्रुंड्टलँड नॉर्वेचा पंतप्रधान.
 • १९४९: मासिमो दालेमा, इटलीचा पंतप्रधान.
 • १९५०: एन. चंद्रबाबू नायडू, आंध्र प्रदेशचा मुख्यमंत्री.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


 • १३१४: पोप क्लेमेंट चौथा.
 • १५२१: झेंगडे, चीनी सम्राट.
 • १९४७: क्रिस्चियन दहावा, डेन्मार्कचा राजा.
 • १९५१: इव्हानो बोनोमी इटलीचा पंतप्रधान.