१७ एप्रिल दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १७ एप्रिल २०१८
१७ एप्रिल दिनविशेष | April 17 in History
सर्वपल्ली राधाकृष्णन. छायाचित्र: मराठीमाती डॉट कॉम आर्काईव्ह.

सर्वपल्ली राधाकृष्णन - (५ सप्टेंबर १८८८ - १७ एप्रिल १९७५) हे भारताचे दुसरे राष्ट्रपती व नामांकित शिक्षणतज्‍ज्ञ हाते.

जागतिक दिवस


 • -

ठळक घटना/घडामोडी


 • ६९: बेड्रियाकमची लढाई - व्हिटेलियस रोमन सम्राटपदी.
 • १४९२: स्पेन व क्रिस्टोफर कोलंबसच्या मध्ये करार. कोलंबसला मसाले आणण्यासाठी एशियाला स्पेनचा प्रतिनिधी म्हणून पाठवण्यास स्पेनची मंजूरी.
 • १५२१: मार्टिन ल्युथरचे वर्मच्या डियेटसमोर भाषण. त्याने आपले तत्त्वज्ञान बदलण्यास नकार दिला.
 • १८६१: अमेरिकन यादवी युद्ध - व्हर्जिनीया अमेरिकेपासून विभक्त झाले.
 • १८९५: माग्वानचा तह - जपानने पराभूत चीनला अपमानास्पद कलमे असलेला तह मंजूर करण्यास भाग पाडले.
 • १९३५: सन म्युंग मूनला येशू ख्रिस्ताने स्वप्नात साक्षात्कार दिला व आपण सुरु केलेले कार्य पुढे नेण्याची आज्ञा केली.
 • १९४१: दुसरे महायुद्ध - युगोस्लाव्हियाने जर्मनीसमोर शरणागति पत्करली.
 • १९६१: पिग्सच्या अखातातील आक्रमण - क्युबाच्या फिदेल कास्त्रोची राजवट उलथवण्यासाठी सी.आय.ए. कडून प्रशिक्षित हल्लेखोर क्युबात उतरले.
 • १९७०: चांद्रयान अपोलो १३तील अंतराळवीर सुरक्षितपणे पृथ्वीवर परतले.
 • १९७५: ख्मेर रूजने कंबोडियाची राजधानी फ्नोम पेन्ह जिंकली.
 • १९८६: सिसिली आणि नेदरलँड्समधील युद्ध ३३५ वर्षांनी अधिकृतरीत्या संपले.
 • २००२: अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेच्या एफ.१६ विमानांच्या बॉम्बहल्ल्यात ४ केनेडियन सैनिक ठार.

जन्म/वाढदिवस


 • ५९३: जोमेइ, जपानी सम्राट.
 • १७३४: तक्सिन, थायलंडचा राजा.
 • १८९४: निकिता ख्रुश्चेव्ह, सोवियेत संघाचा राष्ट्राध्यक्ष.
 • १९७२: मुथिया मुरलीधरन, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
 • १९७४: व्हिक्टोरिया बेकहाम, इंग्लिश गायिका.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


 • १०८०: हॅराल्ड तिसरा, डेन्मार्कचा राजा.
 • १७११: जोसेफ पहिला, पवित्र रोमन सम्राट.
 • १८९१: अलेक्झांडर मॅकेन्झी, कॅनडाचा पंतप्रधान.
 • १९३६: चार्ल्स रुईस डि बीरेनब्रुक, नेदरलँड्सचा पंतप्रधान.
 • १९४४: जे.टी. हर्न, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
 • १९७५: सर्वपल्ली राधाकृष्णन, भारतीय राष्ट्राध्यक्ष.
 • २००४: सौंदर्या, दक्षिण भारतीय अभिनेत्री.
 • २०१२:वसंत दिवाणजी, कन्नड साहित्यात मौल्यवान योगदान देणारे प्रतिभावंत लेखक.