अ आद्याक्षरावरून मुलींची नावे

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ एप्रिल २००६

अ आद्याक्षरावरून मुलींची नावे | a Marathi Baby Girl names by initial

अ आद्याक्षर - मराठी वर्णमालेतील मूलध्वनी पहिला वर्ण. पहिला स्वर. मराठीत अ चे तीन भिन्न उच्चार होतात, पण संस्कृतातल्या प्रमाणे ‘अ’ चा दीर्घोच्चार ‘आ’ होत नाही. संत ज्ञानेश्वर ‘अ’काराची तुलना गणपतीच्या पायांशी करतात. ‘अ’ हा मराठी भाषेतील पहिला वर्ण असल्यामुळे पारंपरिक रित्या लहान मुलांकडून शुभमुहूर्तावर खासकरून दसरा सणाच्या दिवशी पाटी पेन्सिल च्या साहाय्याने गिरवून घेतले जात असे. [अ आद्याक्षरावरून मुलींची नावे, a Marathi Baby Girl names by initial]

नावअर्थ
अकलिप्ता-
अकलंकालंक (डाग, पाप) नसलेली
अखिलासंपूर्ण
अग्नेयीसूर्यपत्नी
अचलास्थिर, पर्वत, दृढ राहणारी
अजयाजिंकता न येणारी
अजिताकुणीही पराभव करु शकत नाही असा (शी)
अणिमाअतिसुक्ष्म
अतिता-
अत्रिप्रिया-
अतुलातुलना करता येत नाही अशी
अथांगातळाचा ठाव न लागणारी
अदितीदेवांची आई, अमर्याद
अद्वितीयाविलक्षण, अनुपम
अधरामुक्त
अधिरा-
अधीतीविद्वान
अधुना-
अनगवती-
अनघानिष्पाप पवित्र, सुंदर
अन्नदाअन्न देणारी
अन्नपुर्णापार्वती
अनयाएक पौराणिक नामविशेष
अन्वयीदोघांत संबंध जोडणारी
अनसूयाअत्रि ऋषिपत्नी
नावअर्थ
अनामापरमेश्वर. ज्याला नाव नाही असा.
अनामिकाकरंगळीच्या शेजारचे बोट
अनामिला-
अनारकली-
अनिजा-
अनिताअशाश्वत
अनिलावारा
अनिशासतत, निरंतर
अनुअप्रत्येक, नंतर, बरोबर
अनुजानंतर जन्मलेली धाकटा बहीण
अनुत्तमासर्वोत्तम
अनुपमाआद्वितीय, ज्याला, जिला उपमा देता येत नाही अशी
अनुप्रिताप्रिय
अनुप्रियाअद्वितीय, तुलना नाही अशी.
अनुयाअनुसरणारी
अनुरतिप्रेम, स्नेह
अनुराधासतरावे नक्षत्र.
अनुरंजनसंतोष, मनधरणी
अनुलेखानंतर जन्मलेली, धाकटी बहीण
अनुसयामत्सरहित
अनुशीलाअद्वितीय चारित्र्याची
अनुश्री-
अनिला-
अनंगलेखाप्रेमपत्र
अपर्णापार्वती, पर्णविरहित