Loading ...
/* Dont copy */

मनाचे श्लोक २०१

मनाचे श्लोक - श्लोक २०१ - [Manache Shlok - Shlok 201] कदा ओळखीमाजि दूजे दिसेना, मनी मानसी द्वैत काही वसेना.

मनाचे श्लोक २०१ | Manache Shlok 201

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक २०१, कदा ओळखीमाजि दूजे दिसेना, मनी मानसी द्वैत काही वसेना

मनाचे श्लोक २०१


कदा ओळखीमाजि दूजे दिसेना ।
मनी मानसी द्वैत काही वसेना ॥
बहूता दिसा आपली भेट जाली ।
विदेहीपणे सर्व काया निवाली ॥ २०१ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक २०१ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


कदाप्यात्मबोधे द्वितीयं न भाति
न वै मानसे द्वैतलेशोऽस्ति किंचित् ।
गतैर्जन्मसंघैः स्वरूपोपलब्धिः
विदेहस्थितौ सर्व-काया-निरासः ॥ २०१ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक २०१ - अर्थ


श्रीसमर्थ सांगत आहेत की,

सत्य ब्रह्माचा संकल्प ।
मिथ्या मायेचा विकल्प ।
ऐसिया द्वैताचा जल्प ।
मनची करी ॥

ते संकल्प-विकल्प करणारे मन उन्मन झाले म्हणजे आपोआपच द्वैताद्वैताचे अनुसंधान तुटून जाते आणि श्रीरामाशिवाय दुसरे काहीच दिसत नाही.

वास्तविक पाहता, ‘आपण’ स्वतःच श्रीरामरूप असून केवळ देहबुद्धिमुळे आपल्याला त्या स्वरूपाची ओळख पटली नव्हती. परंतु आता सद्गुरुचरणाला जोडल्यामुळे ‘अहंब्रह्मास्मि’ हा अंतरी बोध होऊन जन्माचे सार्थक झाले.

वोळखतां ज्ञान वोळखी मोडली ।
भेटी हे जोडली आपणांसी ॥

आपणांसी भेटी जाली बहु दिसा ।
तुटला वळसा मीपणाचा ॥

मीपणाचा भाव भावें केला वाव ।
दास म्हणे देव प्रगटला ॥


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
अभिव्यक्ती · विचारधन · तुकाराम गाथा · संत तुकाराम · अभंग · मराठी सुविचार · मराठी कोट्स · मनाचे श्लोक · समर्थ रामदास

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची