Loading ...

मनाचे श्लोक - श्लोक २००

मनाचे श्लोक - श्लोक २०० - [Manache Shlok - Shlok 200] कळे आकळे रुप ते ज्ञान होता, तेथे आटली सर्वसाक्षी अवस्था.

मनाचे श्लोक - श्लोक २०० | Manache Shlok - Shlok 200

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक २००, कळे आकळे रुप ते ज्ञान होता, तेथे आटली सर्वसाक्षी अवस्था

मनाचे श्लोक - श्लोक २००


कळे आकळे रुप ते ज्ञान होता ।
तेथे आटली सर्वसाक्षी अवस्था ॥
मना उन्मनी शब्द कुंठीत राहे ।
तो रे तोचि तो राम सर्वत्र पाहे ॥ २०० ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक २०० - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


स्वरूपं तु यज्ज्ञायते ज्ञानयोगात्
स्फुट साक्षिताऽन्तर्हिता तत्र सर्वा ।
भवेदुन्मनी कुण्ठिता वाक्च सद्यः
स एव स्वयं रामदृक् सर्वतो यः ॥ २०० ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक २०० - अर्थ


श्रीसमर्थ सांगत आहेत की, श्रीसद्गुरुकृपेने ज्ञान झाले म्हणजे श्रीरामाचे रूप प्रत्यास येते, पण ते सांगता येत नाही. कारण त्या स्वरूपाचा प्रत्यय आला म्हणजे वाचा कुंठित होते, मन उन्मन होते व

जाणे ब्रह्म जाणे माया ।
ते येक जाणावी तूर्या ।
सर्व जाणे म्हणोनिया ।
सर्वसाक्षिणी ॥

अशी जी सर्वसाक्षी तूर्यारूप अवस्था ती सुद्धा नाहीशी होते.

म्हणोनि सर्वसाक्षी मन ।
तेची जालिया उन्मन ।
मग तूर्यारूप ज्ञान ।
तें मावळोन गेलें ॥

तेव्हा आता ते रामरूप कसे आहे म्हणून सांगावे? फार तर त्याचे वर्णन इतकेच करता येईल की, तो राम सर्वत्र भरलेला आहे.

माझा राम अवघाची आपण ।
दुसरें नाहीं त्याचीच आण ॥


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची