Loading ...

मनाचे श्लोक - श्लोक १९९

मनाचे श्लोक - श्लोक १९९ - [Manache Shlok - Shlok 199] अती जीर्ण विस्तीर्ण ते रुप आहे, तेथे तर्कसंपर्क तोही न साहे.

मनाचे श्लोक - श्लोक १९९ | Manache Shlok - Shlok 199

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक १९९, अती जीर्ण विस्तीर्ण ते रुप आहे, तेथे तर्कसंपर्क तोही न साहे

मनाचे श्लोक - श्लोक १९९


अती जीर्ण विस्तीर्ण ते रुप आहे ।
तेथे तर्कसंपर्क तोही न साहे ॥
अती गुढ ते दृश्य तत्काळ सोपे ।
दुजेवीण जे खुण स्वामिप्रतापे ॥ १९९ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १९९ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


पुराणं ततं सर्वतो यत्स्वरूपं
न तर्कस्य लेशोऽपि यस्मिन्विधेयः ।
निगूढं परंत्वाशु तत्स्यात्सुगम्यं
प्रतापाद् गुरोरद्वितीयेतिसंज्ञम् ॥ १९९ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १९९ - अर्थ


श्रीसमर्थ सांगत आहेत की, ते रूप पुरातन, मोठे, बृहत् असून चहूकडे कोंदाटलेले आहे.

त्याच्या ठिकाणी तर्काचा नुसता संपर्कही होत नाही, म्हणजे ते अतर्क्य आहे.

आतर्क्ये तर्कितां नये ॥

ते जरी अती गूढ आहे, तरी श्रीसद्गुरुसमर्थप्रतापाच्या योगाने ते तत्काळ अती सुगम होते.

आहे तरी परम सुगम ।
परी जनासी जाला दुर्गम ।
कां जयाचें चुकले वर्म ।
सत्समागमाकडे ॥

त्याच्यासारखे दुसरे काही नसल्यामुळे ते कशासारखे आहे, हे मात्र सांगता येत नाही. त्याची ओळख पटण्यासाठी काही खूण सांगावी, तर त्याच्यासारखे दुसरे काहीच नाही, एवढीच खूण सांगता येते.

येकरूप देव आरूप ठांईचा ।
तेथें दुजा कैचा कोण आहे ॥


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची