Loading ...

मनाचे श्लोक - श्लोक १९८

मनाचे श्लोक - श्लोक १९८ - [Manache Shlok - Shlok 198] नभे व्यापिले सर्व सृष्टीस आहे, रघूनायका ऊपमा ते न साहे.

मनाचे श्लोक - श्लोक १९८ | Manache Shlok - Shlok 198

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक १९८, नभे व्यापिले सर्व सृष्टीस आहे, रघूनायका ऊपमा ते न साहे

मनाचे श्लोक - श्लोक १९८


नभे व्यापिले सर्व सृष्टीस आहे ।
रघूनायका ऊपमा ते न साहे ॥
दुजेवीण जो तोचि तो हा स्वभावे ।
तया व्यापकू व्यर्थ कैसे म्हणावे ॥ १९८ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १९८ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


नभः संस्थितं व्याप्य विश्वं यथेदं
तथा राम इत्थं न साम्यं कथंचित् ।
स चास्त्यद्वितीयः स्वभावाद् हि रामः
तदर्थं हि व्यर्थं पदं व्यापकेति ॥ १९८ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १९८ - अर्थ


श्रीसमर्थ सांगत आहेत की, मागील श्लोकात श्रीरामरूपाला आकाशाचा दृष्टांत दिला खरा, पण तो दृष्टांत काही लागू पडत नाही. आकाशाने सर्व सृष्टी व्यापली आहे, पण श्रीरामावाचून वस्तुतः दुसरे काहीच नाही आहे, तेव्हा ते रूप आकाशाप्रमाणे (व्याप्यावाचून) व्यापक आहे, असे म्हणणे कसे शोभेल?

ब्रह्म व्यापक हें तों खरें ।
दृश्य आहे तों हें उत्तरे ।
व्यापेंवीण कोण्या प्रकारें ।
व्यापक म्हणावें ॥

कल्याणस्वामींनी समर्थांची जेवढी म्हणून कविता लिहिलेली आहेत, त्यात कूठेही ‘व्यर्थ’ नसता ‘वेर्थ’ असा शब्द आहे पण या ठिकाणी तिसऱ्या व चौथ्या मूळ चरणात हरताळ लावून वर प्रस्तुतचे चरण दुसऱ्या कोणी लिहिलेले असल्यामुळे ‘व्यर्थ’ शब्द साहजिकपणे पडला आहे.


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची