Loading ...

मनाचे श्लोक - श्लोक १५१

मनाचे श्लोक - श्लोक १५१ - [Manache Shlok - Shlok 151] खरें शोधितां शोधितां शोधिताहे, मना बोधिता बोधिता बोधिताहे.

मनाचे श्लोक - श्लोक १५१ | Manache Shlok - Shlok 151

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक १५१, खरें शोधितां शोधितां शोधिताहे, मना बोधिता बोधिता बोधिताहे

मनाचे श्लोक - श्लोक १५१


खरें शोधितां शोधितां शोधिताहे ।
मना बोधिता बोधिता बोधिताहे ॥
परी सर्वही सज्जनाचेनि योगे ।
बरा निश्चयो पाविजे सानुरागे ॥ १५१ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १५१ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


नृभिर्वस्तु संचिन्त्य संचिन्त्य वेद्यं
मनो बोध्य संबोध्य बुद्धं प्रकार्यम् ।
परं संगमात् सज्जनैः सर्व-सिद्धिः
वरो निश्चयो जायते सानुरागात् ॥ १५१ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १५१ - अर्थ


श्रीसमर्थ सांगत आहेत की, आत्मा कोण अनात्मा कोण, नित्य काय अनित्य काय, सार कोणते आणि असार कोणते, याचा सखोल विचार केल्यास या सर्व गोष्टींचे ज्ञान होते.

मनाला हळूहळू या सर्व गोष्टींची गोडी लावून बोध करवून दिल्यास त्याला तो बोध निश्चितच होतो.

पण हे साध्य करण्याकरता ‘संतसंगाची’ आत्यंतिक गरज आहे.

धुंडितां धुंडितां देवो ।
सत्संगें सांपडे जनीं ॥

‘बरा निश्चयो’ म्हणजे शाश्वताचा निश्चय. शाश्वताचा म्हणजे ‘आत्मतत्वाचा’, ‘अहंब्रह्मास्मि’ याचा. देहबुद्धी बळकट झाल्यामुळे मनुष्य संदेहात पडला आहे. तो संदेह नाहीसा होण्यासाठी देहबुद्धी सोडून ‘आत्मबुद्धी’ धरली पाहिजे.

सिद्ध असतां आत्मज्ञान ।
संदेह वाढवी देहाभिमान ।
याकारणें समाधान ।
आत्मनिश्चयें राखावें ॥

‘सानुरागें’ म्हणजे ‘प्रीतीयुक्त’ होऊन. श्रीसद्गुरूंच्या चरणी प्रेम जडले, की शाश्वताचा निवाडा ‘आपोआप’ होतो.


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची