Loading ...

मनाचे श्लोक - श्लोक १५२

मनाचे श्लोक - श्लोक १५२ - [Manache Shlok - Shlok 152] बहूतांपरी कूसरी तत्त्वझाडा, परी अंतरी पाहिजे तो निवाडा.

मनाचे श्लोक - श्लोक १५२ | Manache Shlok - Shlok 152

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक १५२, बहूतांपरी कूसरी तत्त्वझाडा, परी अंतरी पाहिजे तो निवाडा

मनाचे श्लोक - श्लोक १५२


बहूतांपरी कूसरी तत्त्वझाडा ।
परी अंतरी पाहिजे तो निवाडा ॥
मना सार साचार ते वेगळे रे ।
समस्तांमधे एक ते आगळे रे ॥ १५२ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १५२ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


कृते तत्त्वसंख्यासु चातुर्ययोगेपि
अवश्यो परब्रह्मणो हि प्रबोधः ।
मनः सारभूतं तु सत्यं विदूरे
समस्तेषु तद् ह्येकमेवाद्वितीयम् ॥ १५२ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १५२ - अर्थ


श्रीसमर्थ सांगत आहेत की, ‘कूसरी’ म्हणजे चातुर्य. अंगी पुष्कळ चातुर्य असले किंवा तत्त्वांचा शाब्दिक उलगडा चांगला करता आला म्हणजे सार्थकता झाली असे नव्हे, तर अंतरी तो निवाडा म्हणजे शाश्वताचा निवाडा पाहिजे, शाश्वत ते ‘परब्रह्म’ त्याचे ज्ञान पाहिजे.

हे मना, खरोखर सत्य म्हणून जी वस्तू, ती वेगळीच आहे रे. तुझे हे चातुर्य किंवा तत्त्वझाडा तिच्यापुढे काहीच नाही.

ते परब्रह्म सर्वांपासून भिन्न असून देखील ते सर्वांत आहे आणि ते श्रेष्ठ आहे.

पंचभूतीं असे मिश्रित ।
परंतु तें पंचभूतातीत ।
पंकी आकाश अलिप्त ।
असोनि जैसें ॥


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची