Loading ...

मनाचे श्लोक - श्लोक ४७

मनाचे श्लोक - श्लोक ४७ - [Manache Shlok - Shlok 47] मनीं लोचनीं श्रीहरी तोचि पाहे, जनीं जाणतां मुक्त होऊनि राहे.

मनाचे श्लोक - श्लोक ४७ | Manache Shlok - Shlok 47

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक ४७, मनीं लोचनीं श्रीहरी तोचि पाहे, जनीं जाणतां मुक्त होऊनि राहे

मनाचे श्लोक - श्लोक ४७


मनीं लोचनीं श्रीहरी तोचि पाहे ।
जनीं जाणतां मुक्त होऊनि राहे ॥
गुणीं प्रीति राखे क्रमू साधनाचा ।
जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ४७ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ४७ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


हृदा चिन्तयन् लोचनाभ्यां प्रपश्यन्
हरिं भक्तियुक्तो य आस्ते बुधोऽपि ।
गुणप्रीतियुक्तश्चरेत् साधनं यः
स धन्योऽस्ति दासोऽत्र सर्वोत्तमस्य ॥ ४७ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ४७ - अर्थ


श्रीसमर्थ या श्लोकातून सांगत आहेत की, अंतर्बाह्यदृष्टीने जो श्रीरामच पाहतो, श्रीरामावाचून ज्याच्या अंतर्बाह्यदृष्टीला दुसरे काही दिसतच नाही, ज्याचे मन आणि दृष्टी ही राममय झाली आहेत.

असा तो जाणता म्हणजे ज्ञानी असूनही सेव्यसेवकभावाने राहतो. श्रेष्ठ सुगमोपायांत म्हणतात -

माझा राम आवघाची आपण ।
दुसरें नाही त्याची च आण ।
हें स्थित न मोडतां स्वामीसेवकपण ।
दिधलें ऐसा उधार ॥

“लागे” खोडून समारांत “राखे” लिहिले आहे.

सगुणावरचे प्रेम व साधनाचा क्रम जो राखतो. ज्याच्या दृष्टीला सर्वत्र राम दिसतो आहे, असा जो सिद्ध झाला त्याला आणखी सगुणाची भक्ति व साधनांचे अनुष्ठान कशास पाहिजे, असे कोणी विचारले त्यास समर्थ म्हणतात -

आचार उपासना सोडिती ।
ते भ्रष्ट अभक्त दिसती ।
जळो तयांची महंती ।
कोण पुसे ॥

म्हणून सिद्धांनी देखील साधन सोडता कामा नये. सिद्धपणाच्या घमेंडीत जो साधन सोडील तो बद्धच समजावा.

साधन न मने जयाला ।
तो सिद्धपणें बद्ध झाला ॥

ज्ञानबळे उपासना ।
आम्ही भक्त जरी मानूं ना ।
तरी या दिषाच्या पतना ।
पावों अभक्त पणें ॥

जो सर्वोत्तम, श्रीराम त्याचा.

सर्वांमधें जो उत्तम ।
त्या नांव सर्वोत्तम ॥


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची