Loading ...

मनाचे श्लोक - श्लोक १६४

मनाचे श्लोक - श्लोक १६४ - [Manache Shlok - Shlok 164] मनें कल्पिला वीषयो सोडवावा, मनें देव निर्गूण तो ओळखावा.

मनाचे श्लोक - श्लोक १६४ | Manache Shlok - Shlok 164

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक १६४, मनें कल्पिला वीषयो सोडवावा, मनें देव निर्गूण तो ओळखावा

मनाचे श्लोक - श्लोक १६४


मनें कल्पिला वीषयो सोडवावा ।
मनें देव निर्गूण तो ओळखावा ॥
मनें कल्पिता कल्पना ते सरावी ।
सदा संगती सज्जनाची धरावी ॥ १६४ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १६४ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


मनः कल्पिता द्वैतबुद्धिः प्रहेया
प्रधार्या हृदा कल्पनाऽद्वैतरूपा ।
स्वरूपस्थितौ साऽपि यायाद् हृदन्तात्
सदा संगतिः सज्जनानां विधेया ॥ १६४ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १६४ - अर्थ


श्रीसमर्थ सांगत आहेत की, द्वैत ही अशुद्ध तर अद्वैत ही शुद्ध कल्पना होय. मनाने द्वैताची जी अशुद्ध कल्पना केलेली असते, ती तर सोडलीच पाहिजे. पण अद्वैताची जी शुद्ध कल्पना आहे, ती सुद्धा जर विरून गेली, तरंच निर्गुण देवाची ओळख पटणार आहे. शुद्ध कल्पनेने अशुद्ध कल्पना दवडावी व शेवटी अद्वैताची शुद्ध कल्पना जी उरेल, ती सुद्धा दडवून तदृप व्हावे.

अद्वैतकल्पना प्रकाशे ।
ते चि क्षणीं द्वैत नासे ।
द्वैतासरिसी निरसे ।
सबळ कल्पना ॥

कल्पनेनें कल्पना सरे ।
ऐसी जाणावी चतुरें ।
सबळ गेलिया नंतरे ।
शुद्ध उरली ॥

शुद्ध कल्पनेचें रुप ।
तें चि जें कल्पी स्वरुप ।
स्वरुप कल्पितां तदृप ।
होये आपण ॥

कल्पनेसी मिथ्यत्व आलें ।
सहज चि तदृप जालें ।
आत्मनिश्चयें नासिलें ।
कल्पनेसी ॥

अद्वैताची शुद्ध कल्पना करता करता, त्या कल्पनेलाही मिथ्यत्व येऊन ती नाहीशी व्हावी व केवळ निर्विकल्प स्वरूप उरावे.

निर्विकल्पास कल्पावें ।
कल्पना मोडे स्वभावें ।
मग नसोनि असावे ।
कल्पकोटी ॥

कल्पनेचें येक बरें ।
मोहरितां च मोहरे ।
स्वरुपी घालितां भरे ।
निर्विकल्पी ॥

निर्विकल्पासी कल्पितां ।
कल्पनेची नुरे वार्ता ।
निःसंगास भेटों जातां ।
निःसंग होईजे ॥

अशा या सगळ्या गोष्टीचं आकलन होण्यासाठी मात्र ‘सद्गुरूंची’ आवश्यकता असते.


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची