Loading ...

मनाचे श्लोक - श्लोक १६३

मनाचे श्लोक - श्लोक १६३ - [Manache Shlok - Shlok 163] देहेबुद्धिचा निश्चयो दृढ जाला, देहातीत ते हीत सांडीत गेला.

मनाचे श्लोक - श्लोक १६३ | Manache Shlok - Shlok 163

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक १६३, देहेबुद्धिचा निश्चयो दृढ जाला, देहातीत ते हीत सांडीत गेला

मनाचे श्लोक - श्लोक १६३


देहेबुद्धिचा निश्चयो दृढ जाला ।
देहातीत ते हीत सांडीत गेला ॥
देहेबुद्धि ते आत्मबुद्धि करावी ।
सदा संगती सज्जनाची धरावी ॥ १६३ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १६३ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


दृढो निश्चयो यस्य देहात्मबुद्धौ
सुदूरं हितादात्मनः सो नु यातः ।
परित्यज्य तां चात्मबुद्धिः प्रधार्या
सदा संगतिः सज्जनानां विधेया ॥ १६३ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १६३ - अर्थ


श्रीसमर्थ सांगत आहेत की, देह तोच मी, असा निश्चय बळावल्यामुळे, देहातीत जे हित, त्याला मानव मुकला.

हित आहे देहातीत ।
म्हणौनि निरोपिती संत ।
देहबुद्धीनें अन्हित ।
हों चि लागे ॥

म्हणून देह तोच मी, अशी जी बुद्धी झालेली असते, ती झटकून ‘अहं ब्रह्मास्मि’ अशी आत्मबुद्धी धरावी. मृगजलाचे ठिकाणी जलबुद्धी ठेवल्यास शीण मात्र नक्कीच होणार. जलबुद्धी जलाच्याच ठिकाणी झाली पाहिजे.

विचक्षणें याकारणें ।
देहबुद्धि त्यजावी श्रवणें ।
सत्य ब्रह्मीं साचारणें ।
मिळोन जावें ॥

हे साधण्यासाठी सत्संगती धरणे, हाच ‘एकमेव’ उपाय.

न करितां वित्पत्तीचा श्रम ।
सकळ शास्त्रार्थ होये उगम ।
सत्समागमाचें वर्म ।
तें हें ऐसें असे ॥

जें वित्पत्तीनें न कळे ।
तें सत्समागमें कळे ।
सकळ शास्त्रार्थ आकळे ।
स्वानुभवासी ॥

म्हणौनि कारण सत्समागम ।
तेथें नलगे वित्पत्तीश्रम ।
जन्मसार्थकाचें वर्म ।
वेगळें चि आहे


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची