Loading ...

मनाचे श्लोक - श्लोक १६२

मनाचे श्लोक - श्लोक १६२ - [Manache Shlok - Shlok 162] अहंतागुणे नीति सांडी विवेकी, अनीतीबळे श्लाघ्यता सर्व लोकी.

मनाचे श्लोक - श्लोक १६२ | Manache Shlok - Shlok 162

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक १६२, अहंतागुणे नीति सांडी विवेकी, अनीतीबळे श्लाघ्यता सर्व लोकी

मनाचे श्लोक - श्लोक १६२


अहंतागुणे नीति सांडी विवेकी ।
अनीतीबळे श्लाघ्यता सर्व लोकी ॥
परी अंतरी अर्वही साक्ष येते ।
प्रमाणांतरे बुद्धि सांडूनि जाते ॥ १६२ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १६२ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


विवेकेऽप्यहंताबलाद् यात्यनीतिम्
अनीत्या जनः श्लाघ्यतां याति लोके ।
परं वेत्ति चित्ते निजं दम्भभावं
प्रमाणान्तराण्यस्य बुद्धिर्जहाति ॥ १६२ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १६२ - अर्थ


श्रीसमर्थ सांगत आहेत की, अहंतेच्या योगाने विचारी मनुष्य देखील नीति सोडतो, म्हणजे वेदमर्यादा वगैरे पाळत नाही. अनितीच्या योगाने लोकांत त्याची मानमान्यता ही होते, परंतु तो विचारीच असल्यामुळे त्याचे मन त्याला सतत खात राहते. तथापि, विचारांवर अनीतीचा पगडा बसल्यामुळे त्याची बुद्धी वेदप्रमाणे वगैरे काही पाहत नाही, किंवा आपली बुद्धी वेदप्रमाणे वगैरे काही जुमानत नाही, याविषयी त्याच्या मनात त्याला स्वतःच्या मूर्खपणाची खूण पटतच असते.

प्रमाणोत्तरी चित्त तें ही न घाली ।
तया पापरुप्यास कां रांड व्याली ॥


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची