Loading ...

मनाचे श्लोक - श्लोक १६५

मनाचे श्लोक - श्लोक १६५ - [Manache Shlok - Shlok 165] देहादीक प्रपंच हा चिंतियेला, परी अंतरी लोभ निश्चित ठेला.

मनाचे श्लोक - श्लोक १६५ | Manache Shlok - Shlok 165

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक १६५, देहादीक प्रपंच हा चिंतियेला, परी अंतरी लोभ निश्चित ठेला

मनाचे श्लोक - श्लोक १६५


देहादीक प्रपंच हा चिंतियेला ।
परी अंतरी लोभ निश्चित ठेला ॥
हरीचिंतने मुक्तिकांता करावी ।
सदा संगती सज्जनांची धरावी ॥ १६५ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १६५ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


प्रपञ्चे स्वदेहादि-संचिन्तनात्तु
मनो वर्धते लोभ एतान्तरे स्वे ।
अतः श्रीश-भक्त्या प्रवृण्वीत मुक्तिं
तदर्थं सदा साधुसंगो विधेयः ॥ १६५ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १६५ - अर्थ


श्रीसमर्थ सांगत आहेत की, मानवाने सदैव देह व तत्संबंधी जो प्रपंच, किंवा मी व माझे यांचेच चिंतन केले. पण हाती फळ काय आले? अंतःकरणात मात्र लोभाचे कायमचे बिऱ्हाड होते आणि मग

पुरेना जनीं लोभ रे क्षोभ त्यांते ।
म्हणोनी जनीं मागुता जन्म घेतें ॥

देहादिकाची चिंता केली तर लोभ उत्पन्न होतो व लोभामुळे ‘पुनरपि जननं पुनरमि मनणं’ अशी अवस्था होते. म्हणून प्रपंचाची चिंता न करता देवाची चिंता करून मुक्तिकांता आपलीशी करून घ्यावी.

प्रपंच हा विसंच रे ।
तया परी च संच रे ।
भुलों नका भुलों नका ।
क्षणीक सर्व वोळखा ॥


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची