Loading ...

मनाचे श्लोक - श्लोक १६६

मनाचे श्लोक - श्लोक १६६ - [Manache Shlok - Shlok 166] अहंकार विस्तारला या देहाचा, स्त्रियापुत्रमित्रादिके मोह त्यांचा.

मनाचे श्लोक - श्लोक १६६ | Manache Shlok - Shlok 166

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक १६६, अहंकार विस्तारला या देहाचा, स्त्रियापुत्रमित्रादिके मोह त्यांचा

मनाचे श्लोक - श्लोक १६६


अहंकार विस्तारला या देहाचा ।
स्त्रियापुत्रमित्रादिके मोह त्यांचा ॥
बळे भ्रांति हें जन्मचिंता हरावी ।
सदा संगती सज्जनांची धरावी ॥ १६६ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १६६ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


अहंकार-विस्तार एषोऽस्ति देह-
प्रिया-पुत्र-मित्रादिको मोहजन्यः ।
अतोऽहंभ्रमं जन्महेतुं निरस्येत्
तदर्थं सदा साधुसङ्गं विदध्यात् ॥ १६६ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १६६ - अर्थ


श्रीसमर्थ या श्लोकात सांगत आहेत की, देहाच्या अहंकाराचा विस्तार होऊन स्त्री, पुत्र, मित्र इत्यादिकांचा त्याला मोह पडला आहे.

परंतु स्त्रियादिकांचा मोह हा नुसता भ्रम असून, तोच जन्म-मरणाच्या फेऱ्याला कारण आहे. म्हणून त्या भ्रमाचे ज्ञानबलाने निरसन केले पाहिजे. माता, पिता, बहिण, भ्राता, सुहृद, वनिता, प्रपंच, कुळ, धन, धान्य, घर, दार, तारुण्य, वैभव इत्यादिकांचा मनुष्याला नुसता भ्रम झालेला आहे. हे प्राण्या,

ये च क्षणीं मरोनी जासी ।
तरी रघुनाथीं अंतरलासी ।
माझें माझें म्हणतोसी ।
म्हणौनियां ॥

तुवां भोगिल्या पुनरावृत्ती ।
ऐसीं मायबापें किती ।
स्त्री कन्या पुत्र होती ।
लक्षानलक्ष ॥

कर्मयोगें सकळ मिळालीं ।
येके स्थळीं जन्मास आलीं ।
ते तुवां आपुलीं मानली ।
कैसी रे पढतमूर्खा ॥

हे संपूर्ण ज्ञान होण्याला आणि ठसण्याला सद्गुरुचरणच सेवले पाहिजे.


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची