Loading ...
/* Dont copy */

मनाचे श्लोक - श्लोक ८७

मनाचे श्लोक - श्लोक ८७ - [Manache Shlok - Shlok 87] मुखी राम त्या काम बाधुं शकेना, गुणे इष्ट धारिष्ट त्याचे चुकेना.

मनाचे श्लोक - श्लोक ८७ | Manache Shlok - Shlok 87

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक ८७, मुखी राम त्या काम बाधुं शकेना, गुणे इष्ट धारिष्ट त्याचे चुकेना

मनाचे श्लोक - श्लोक ८७


मुखी राम त्या काम बाधुं शकेना ।
गुणे इष्ट धारिष्ट त्याचे चुकेना ॥
हरीभक्त तो शक्त कामास भारी ।
जगीं धन्य तो मारुती ब्रह्मचारी ॥ ८७ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ८७ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


मुखे यस्य रामो न कामोऽस्ति चित्ते
न तद्-धैर्यलोपो भवेत् संकटेषु ।
हरेर्भक्तियोगेन कामं विजित्य
स धन्योऽभवद् मारुतिब्रह्मचारी ॥ ८७ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ८७ - अर्थ


श्रीसमर्थ अत्यंत विश्वासाने आपल्या सर्वांना सांगत आहेत की, अखंड नामस्मरण करणाऱ्याला कामाची बाधा होऊच शकत नाही.

श्रीसंत एकनाथ महाराज एकनाथी भागवतात असे म्हणतात की,

जो कोणी स्मरे माझें नामु ।
तिकडे पाहूं न शके कामु ॥ ए.भा.१२.१५५ ॥

श्रीरामाच्या गुणसंकीर्तनाच्या योगाने, साधकावर कितीही संकटे आली, तरीही तो डगमगत नाही.

विषई धावें वासना ।
परी तो कदा डळमळिना ।
ज्याचें धारिष्ट चळेना ।
तो सत्वगुण ॥

हरिभक्ती करणारा सामर्थ्यवान होय, त्याच्या पुढे कामाचे काहीही चालत नाही. तो कामाला जिंकतो.

पहिल्या तीन चरणात श्रीरामनामस्मरणाचा जो महिमा वर्णिला आहे, त्याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे महाबली श्रीहनुमान होय!


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची