Loading ...

मनाचे श्लोक - श्लोक ८८

मनाचे श्लोक - श्लोक ८८ - [Manache Shlok - Shlok 88] बहू चांगले नाम या राघवाचे, अती साजिरे स्वल्प सोपे फुकाचे.

मनाचे श्लोक - श्लोक ८८ | Manache Shlok - Shlok 88

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक ८८, बहू चांगले नाम या राघवाचे, अती साजिरे स्वल्प सोपे फुकाचे

मनाचे श्लोक - श्लोक ८८


बहू चांगले नाम या राघवाचे ।
अती साजिरे स्वल्प सोपे फुकाचे ॥
करी मूळ निर्मूळ घेता भवाचे ।
जिवां मानवां हेंचि कैवल्य साचें ॥ ८८ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ८८ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


अतीवोत्तमं सुन्दरं स्वल्पवर्णं
अमूल्यं सुलभ्यं हितं रामनाम ।
जनैः कीर्त्यमानं भवध्वंसकं यत्
तदेवेह कैवल्यरूपं नराणाम् ॥ ८८ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ८८ - अर्थ


श्रीसमर्थ अत्यंत कळवळीने आपल्या सर्वांना बोध करवून देत आहेत की, “राम” ही दोन अक्षरे किती चांगली आहेत! ही दोन अक्षरे अत्यंत गोड असून, थोडक्यात आहेत, सोपी आहेत आणि विशेष म्हणजे फुकटचीही आहेत!

श्रोता प्रश्न करतो की यापेक्षा जास्त या नामाचे काही वैशिष्ट्ये नाहीत काय? या अक्षरांचे इतकेसेच महत्त्व असेल, तर मग यात विशेष काही नाही. वक्ता उत्तर देतो की, आम्ही पहिल्या दोन चरणांत सांगितलेले गुण तर या नामात आहेतच, पण याचा अत्यंत महत्त्वाचा गुण म्हणजे, हे नाम जो अखंडपणे स्मरतो, त्याची जन्ममरणाच्या फेऱ्यांमधून कायमची सुटका होते.

रामनाम घेतले असता भवाचे, म्हणजे जन्माचे मूळ जी वासना, त्याचे निर्मूलन नाम करते. आणि याचसाठी आम्ही म्हणतो की, रामनामस्मरण हेच आमचे खरे कैवल्यधाम होय! हाच आम्हाला लाभलेला मोक्ष होय!

सोपें सुगम हें नाम राघवाचे ।
सर्व काळ वाचे येवों द्यावें ।
येवों द्यावें वाचे नाम निरंतर ।
तेणे हा संसार तरीजेले ।
तरीजेल नामी रामदास म्हणे ।
सावधान होणें रामनामीं ॥


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची