Loading ...

मनाचे श्लोक - श्लोक ६२

मनाचे श्लोक - श्लोक ६२ - [Manache Shlok - Shlok 62] निजध्यास तो सर्व तुटोनि गेला, बळें अंतरीं शोक संताप ठेला.

मनाचे श्लोक - श्लोक ६२ | Manache Shlok - Shlok 62

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक ६२, निजध्यास तो सर्व तुटोनि गेला, बळें अंतरीं शोक संताप ठेला

मनाचे श्लोक - श्लोक ६२


निजध्यास तो सर्व तुटोनि गेला ।
बळें अंतरीं शोक संताप ठेला ॥
सुखानंद आनंद भेदें बुडाला ।
मना निश्चयो सर्व खेदे उडाला ॥ ६२ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ६२ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


भवद्वै निदिध्यास-भङ्गोऽपि तस्य
बलादुद्भवेत् शोक-संताप-वृत्तिः ।
सुखानन्द-नाशो भवेद् भेदबुद्ध्या
मनोनिश्चयो लुप्तते हन्त सर्वः ॥ ६२ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ६२ - अर्थ


श्रीसमर्थ या श्लोकातून आपल्याला सांगत आहेत की, आपण आपल्या खऱ्या ध्येयापासून तुटून गेलो आहोत. अशामुळे आपल्या अंतःकरणात शोक आणि संतापच बळावलेले दिसतात. बाहेरील दृष्य जगतापासून निर्माण होणारे सुख आणि मूळचा शाश्वत आनंद यातील महत्त्वाचा फरक आपण सर्व विसरलेलो आहोत. या सगळ्या कारणांमुळे मनात इतका खेद निर्माण झालाय की दृढ निश्चय करण्याचे बळ देखील आता आपल्यात उरलेले नाही.

अभिमानें वाद वाढवावा ।
तरी आत्मघात करावा ।
मनीं द्वैतभाव उपजावा ।
दुःखमूळ ॥ १ ॥

अभिमाने उठे मत्सर ।
मत्सरें ये तिरस्कार ।
पुढें क्रोधाचा विकार ।
प्रबळें बळें ॥ २ ॥

एवं षड्रिपु बळावती ।
मन पावे अधोगती ।
तेणें उपासना विस्मृती ।
सहज चि होये ॥ ३ ॥

उपासनाविस्मृतियोगें ।
मनी संशय उपजों लागे ।
क्षणक्षणीं विक्षोभें मन भंगे ।
साधकाचें ॥ ४ ॥

या सर्व पतनाचें मूळ ।
जनीं वाचाळता केवळ ।
तरी तो कासया व्हावा निर्फळ ।
वादवेवाद ॥ ५ ॥

श्रीगुरुचरणीं पूर्ण निष्ठा ।
ठेवोनि राही भक्तश्रेष्ठा ।
तेणें तुझी कामना इष्टा ।
पूर्ण होवे ॥ ६ ॥


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची