Loading ...

मनाचे श्लोक - श्लोक ८२

मनाचे श्लोक - श्लोक ८२ - [Manache Shlok - Shlok 82] बहु नाम या रामनामी तुळेना, अभाग्या नरा पामरा हे कळेंना.

मनाचे श्लोक - श्लोक ८२ | Manache Shlok - Shlok 82

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक ८२, बहु नाम या रामनामी तुळेना, अभाग्या नरा पामरा हे कळेंना

मनाचे श्लोक - श्लोक ८२


बहु नाम या रामनामी तुळेना ।
अभाग्या नरा पामरा हे कळेंना ॥
विषा औषधा घेतले पार्वतीशे ।
जिवा मानवा किंकरा कोण पुसे ॥ ८२ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ८२ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


बहून्यन्यनामानि तुल्यानि नास्येति
अभाग्यान्न जानात्ययं पामरोऽज्ञः ।
इदं पार्वतीशेन बुद्धं विषघ्नं
कथा मानवस्यात्र का किंकरस्य ॥ ८२ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ८२ - अर्थ


श्रीसमर्थ या श्लोकातून सांगत आहेत की,

काय करावे कष्टसाध्य मंत्र अन्य ।
नश्वर फळद विधानलोपें देती दैन्य ।
एक होत्साता शाश्वतफळद धन्य ।
उघडा मंत्र श्रीराम ॥

जेणें दिग्बंधन जालें मुक्त ।
जेणें विधिनिषेध केला भक्त ।
जो आचांडाळविप्रपर्यंत युक्त ।
तो उघडा मंत्र श्रीराम ॥

जो नवविधभक्तीचे मूळ ।
जो चतुर्विधमुक्तीचें फळ ।
जो सर्व साधनांची सिद्धि केवळ ।
तो उघडा मंत्र श्रीराम ॥

जयाचें वर्णितां महिमान ।
न शक्रोमि म्हणजे चतुरानन ।
शेषा सहस्त्रमुखीं घडे मौन ।
तो उघडा मंत्र श्रीराम ॥

तारकब्रह्म हें नाम ज्याचें ।
काशी मुक्तिक्षेत्र हें गौरव त्याचें ।
जें कंठरत्न उदास सदाशिवाचें ।
तो उघडा मंत्र श्रीराम ॥

सकळ जनामधें नाम ।
राम नाम उत्तमोउत्तम ।
श्रम जाउनी विश्राम ।
चंद्रमौळी पावला ॥

तेथे क्षुद्र अशा मनुष्याची काय कथा? असे समर्थ म्हणत आहेत.


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषय सूची