Loading ...

मनाचे श्लोक - श्लोक ६३

मनाचे श्लोक - श्लोक ६३ - [Manache Shlok - Shlok 63] घरी कामधेनू पुढें ताक मागें, हरीबोध सांडोनि वेवाद लागे.

मनाचे श्लोक - श्लोक ६३ | Manache Shlok - Shlok 63

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक ६३, घरी कामधेनू पुढें ताक मागें, हरीबोध सांडोनि वेवाद लागे

मनाचे श्लोक - श्लोक ६३


घरी कामधेनू पुढें ताक मागें ।
हरीबोध सांडोनि वेवाद लागे ॥
करी सार चिंतामणी काचखंडे ।
तया मागतां देत आहे उदंडे ॥ ६३ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ६३ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


यथा कामधेनुप्रभोस्तक्र-याञ्चा
तथैवात्मवेत्तुश्च वादप्रियत्वम् ।
स संत्यज्य चिन्तामणिं काचखण्डान्
प्रयाचेत तस्मै न कस्तान् प्रदद्यात् ॥ ६३ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ६३ - अर्थ


श्रीसमर्थ या श्लोकातून आपल्या सर्वांना सांगू इच्छितात की, आपल्या घरी कामधेनु असून सुद्धा आपण मात्र ताक मिळण्याचीच भीक मागत आहोत. श्रीहरीचे अखंड स्मरण करण्या ऐवजी आपण निष्फळ वादविवाद करण्यातच वेळ वाया घालवीत आहोत. आपल्याकडे चिंतामणी असूनही आपण तुटलेल्या काचेचे तुकडेच गोळा करण्यात धन्यता मानतो.

आराध्य देव अति समर्थ ।
वरी भक्ताचा दृढ भावार्थ ।
तरी तें भक्तिप्रेम व्यर्थ ।
होईल कां हो ॥ १ ॥

ऐसा सद्गुरु समर्थ असतां ।
सेवकें कां धरावी दीनता ।
समर्थसेवका वक्र पहातां ।
उरी कैसी कोणासी ॥ २ ॥

कामधेनु असतां द्वारी ।
तक्र मागणें घरोघरी ।
तेणें पढतमूर्खता पदरीं ।
येऊं पाहे ॥ ३ ॥

अथवा चिंतामणी असे करीं ।
तया मागे काचखंडे परी ।
तो जन्मदरिद्री भिकारी ।
भोगूं नेणें सर्वथा ॥ ४ ॥

तेवी श्रीसद्गुरुभक्त ।
करूं लागतां वादवेवाद ।
तेणे शुद्ध ज्ञानाचा पथ ।
चुकोनि गेला ॥ ५ ॥

तस्मात् वादवेवाद सोडावा ।
सुखसंवाद सर्वथा करावा ।
ब्रह्मगोळ अवघा भरावा ।
श्रीरामदास्यें ॥ ६ ॥

श्रीरामांच्या दासाचे दास ।
त्यांचे जे जे अनुदास ।
तयांना किंकर होय उदास ।
महद्भाग्यें ॥ ७ ॥


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची