Loading ...
/* Dont copy */

मनाचे श्लोक - श्लोक ६४

मनाचे श्लोक - श्लोक ६४ - [Manache Shlok - Shlok 64] अती मूढ त्या दृढ बुद्धि असेना, अती काम त्या राम चित्ती वसेना.

मनाचे श्लोक - श्लोक ६४ | Manache Shlok - Shlok 64

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक ६४, अती मूढ त्या दृढ बुद्धि असेना, अती काम त्या राम चित्ती वसेना

मनाचे श्लोक - श्लोक ६४


अती मूढ त्या दृढ बुद्धि असेना ।
अती काम त्या राम चित्ती वसेना ॥
अती लोभ त्या क्षोभ होइल जाणा ।
अती वीषयी सर्वदा दैन्यवाणा ॥ ६४ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ६४ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


दृढा नास्ति बुद्धिर्विमूढस्य पुंसो
न चित्तेऽस्ति रामोऽतिकामाकुलस्य ।
प्रवृत्तेऽतिलाभे भवेत् क्षुब्ध-चित्तः
प्रसक्तोऽतिभोगेषु दैन्यं प्रयाति ॥ ६४ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ६४ - अर्थ


श्रीसमर्थ या श्लोकातून सांगत आहेत की, विषयवासना प्रबल असलेल्या माणसाकडून श्रीरामचिंतन कधीच घडत नाही. आणि ज्याच्या मुखी अखंड रामनाम चालू असते, त्याला विषयाची बाधा कधीच होत नाही. काम आहे तेथे राम नाही व राम आहे तेथे काम नाही.

मुखीं राम त्या काम बाधूं शकेना ॥ ८७ ॥

लोभाला काही मर्यादा नसते. त्यामुळे दुःखाचे कारण अनावर लोभ, हेच होय.

पुरेना जनीं लोभ रे क्षोभ त्यातें ॥ १६ ॥

जाली विषईं वृत्ति अनावर ।
दृढ धरिल संसार ।
परमार्थचर्चेचा विचार ।
मळिण जाला ॥

मोड घेतला परमार्थाचा ।
हव्यास धरिला प्रपंचाचा ।
भार वाहिला कुटुंबाचा ।
काबाडी जाला ॥

मानिला प्रपंची आनंद ।
केला परमार्थी विनोद ।
भ्रांत मूढ मतिमंद ।
लोभला कांमीं ॥


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची