Loading ...
/* Dont copy */

मनाचे श्लोक - श्लोक ६५

मनाचे श्लोक - श्लोक ६५ - [Manache Shlok - Shlok 65] नको दैन्यवाणें जिणे भक्तिऊणे, अती मुर्ख त्या सर्वदा दु:ख दूणे.

मनाचे श्लोक - श्लोक ६५ | Manache Shlok - Shlok 65

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक ६५, नको दैन्यवाणें जिणे भक्तिऊणे, अती मुर्ख त्या सर्वदा दु:ख दूणे

मनाचे श्लोक - श्लोक ६५


नको दैन्यवाणें जिणे भक्तिऊणे ।
अती मुर्ख त्या सर्वदा दु:ख दूणे ॥
धरीं रे मना आदरें प्रीति रामी ।
नको वासना हेमधामीं विरामीं ॥ ६५ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ६५ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


अभक्त्या हरी जीवितं माऽस्तु दीनं
भवेत् चातिमौढ्ये सदा दुःखदुःखम् ।
मनो रामचन्द्रेऽर्पय प्रीतियोगं
विरामेषु ते मास्तु वाञ्छा धनादौ ॥ ६५ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ६५ - अर्थ


तेव्हा, हे देवा, असले भक्तिहीन दैन्यवाणे जिणे मला देऊ नकोस. माझी वासना विषयांच्या ठिकाणी अनावर होऊ देऊ नकोस.

पण जो मूर्ख आहे, त्याला जरी ठाऊक असले की, संसार हा दुःखमूळ आहे, विषय हे दुःखालाच कारण होणार आहेत, तरी पण त्याच संसारापासून व विषयांपासून तो सुखाची अपेक्षा करत असतो. याचा परिणाम असा होतो की, त्याला सुख तर होत नाहीच, पण दुःख मात्र दुप्पट होते.

होईजेतें कष्टी तें चि कां धरावें ।
वेगी उधरावें आपणासी ॥

तेव्हा हे मना, ज्यापासून दुःख होणे निश्चित आहे ते विषयचिंतन कायमचे सोडून दे. हे मना, हेम, धाम, विराम इत्यादि पदार्थांवरील आसक्ती सोडून अनन्यभावाने श्रीरामाच्या ठिकाणी रत हो, म्हणजे श्रीरामाची तुला सहज भेट होईल. एरवी नाही. ५९ व्या श्लोकात मागे सांगितलेच आहे की,

मनीं कामना राम नाहीं जयाला ।
अती आदरें प्रीति नाहीं तयाला ॥


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची