Loading ...
/* Dont copy */

मनाचे श्लोक - श्लोक ६६

मनाचे श्लोक - श्लोक ६६ - [Manache Shlok - Shlok 66] नव्हे सार संसार हा घोर आहे, मना सज्जना सत्य शोधुनि पाहे.

मनाचे श्लोक - श्लोक ६६ | Manache Shlok - Shlok 66

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक ६६, नव्हे सार संसार हा घोर आहे, मना सज्जना सत्य शोधुनि पाहे

मनाचे श्लोक - श्लोक ६६


नव्हे सार संसार हा घोर आहे ।
मना सज्जना सत्य शोधुनि पाहे ॥
जनीं वीष खातां पुढे सूख कैचे ।
करीं रे मना ध्यान या राघवाचें ॥ ६६ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ६६ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


असारोऽस्ति संसार एषोऽतिघोरो
मनः सज्जनान्वेषय त्वं हि सत्यम् ।
विषं भक्षितं चेत् सुखं ते कुतः स्याद्
अतो रामचन्द्रं सदा चिन्तय त्वम् ॥ ६६ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ६६ - अर्थ


श्रीसमर्थ म्हणतात,

संसार म्हणिजे सवें च स्वार ।
नाहीं मरणास उधार ।
मापीं लागलें शरीर ।
घडीनें घडी ॥

संसार म्हणिजे माहा पूर ।
माजी जळचरें अपार ।
डंखूं धावती विखार ।
काळसर्प ॥

असा हा संसार असार आणि घोर आहे. त्यात सुख मानणारा महामूर्ख होय.

परम मूर्खांमाजी मूर्ख ।
जो संसारी मानी सुख ।
या संसारदुःखा ऐसें दुःख ।
आणीक नाही ॥

संसार नुसता विषतुल्या आहे, तेव्हा त्या विषाचे सेवन करीत असता सुख कोठून येणार ?

यासाठी, हे मना, तू संसारचिंता सोडून देऊन श्रीरामाचे ध्यान कर, म्हणजे तुला परम्सुखाची प्राप्ती होईल.

संसारीचें दुख मज वाटे सुख ।
राघवाचें मुख पाहातां चि ॥


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची