Loading ...

मनाचे श्लोक - श्लोक ६७

मनाचे श्लोक - श्लोक ६७ - [Manache Shlok - Shlok 67] घनश्याम हा राम लावण्यरुपी, महाधीर गंभीर पूर्णप्रतापी.

मनाचे श्लोक - श्लोक ६७ | Manache Shlok - Shlok 67

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक ६७, घनश्याम हा राम लावण्यरुपी, महाधीर गंभीर पूर्णप्रतापी

मनाचे श्लोक - श्लोक ६७


घनश्याम हा राम लावण्यरुपी ।
महाधीर गंभीर पूर्णप्रतापी ॥
करी संकटीं सेवकांचा कुडावा ।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ६७ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ६७ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


घनश्यामवर्णोऽतिलावण्ययुक्तो
गभीरोऽतिधीरः प्रतापेन पूर्णः ।
स्वभक्तस्य यः संकटे पक्षपाती
स रामः प्रभाते हृदा चिन्तनीयः ॥ ६७ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ६७ - अर्थ


श्रीसमर्थ, श्रीरामाचे वर्णन करताना सांगतात की, श्रीराम मेघाप्रमाणे सावळ्या वर्णाचा आहे.

कुढावा म्हणजे रक्षण.

म्हणे दास हा राम तत्काळ पावे ।
करी संकटी सेवकाचें कुडावें ।
प्रतापें चि ब्रह्मादिकां सोडवीलें ।
महीमंडळालागि आनंदवीलें ॥

प्राभातकाळी मन साहजिकच उद्वेग रहित व हर्षयुक्त असते, यासाठी नामस्मरण विशेषतः तेव्हा करावे, असे सांगितले आहे. पण सकाळी नामचिंतन झाले म्हणून इतर वेळी रिकामे बसून रहायचे, असा याचा अर्थ होत नाही. यासाठी समर्थ दासबोधात सांगतात,

हरूषकाळी विषमकाळीं ।
पर्वकाळी प्रस्तावकाळी ।
विश्रांतिकाळीं निद्राकाळीं ।
नामस्मरण करावें ॥

आनंदाची परमोच्च स्थिती किंवा अत्यंत प्रतिकूल परिस्थिती, पंचांगात सांगितलेला विशेष काळ असो नाहितर पश्चत्तापाने पोळलेली परिस्थिती असो, सहज आरामात पडलेले असा किंवा अगदी झोप आता डोळ्यावर आली आहे, अशा कोणत्याही अवस्थेत नामस्मरण करावे.

नित्य नेम प्रातःकाळी ।
माध्यानकाळी सायंकाळी ।
नामस्मरण सर्व काळी करीत जावें ॥


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची