Loading ...
/* Dont copy */

मनाचे श्लोक - श्लोक ६१

मनाचे श्लोक - श्लोक ६१ - [Manache Shlok - Shlok 61] उभा कल्पवृक्षातळीं दु:ख वाहे, तया अंतरीं सर्वदा तेचि आहे.

मनाचे श्लोक - श्लोक ६१ | Manache Shlok - Shlok 61

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक ६१, उभा कल्पवृक्षातळीं दु:ख वाहे, तया अंतरीं सर्वदा तेचि आहे

मनाचे श्लोक - श्लोक ६१


उभा कल्पवृक्षातळीं दु:ख वाहे ।
तया अंतरीं सर्वदा तेचि आहे ॥
जनी सज्जनी वाद हा वाढवावा ।
पुढें मागता शोक जीवीं धरावा ॥ ६१ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ६१ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


समाश्रित्य कल्पद्रुमं दुःखितो यः
सदा तस्य चित्ते वसत्येव दुःखम् ।
समं सज्जनैर्यो विवादं करोति
ततो याति संतापमन्तर्महान्तम् ॥ ६१ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ६१ - अर्थ


श्रीसमर्थ या श्लोकातून आपल्याला समजवून सांगत आहेत की, कल्पतरुच्या खाली उभे राहूनही आपण दुःखीच आहोत. परमात्मा श्रीराम आपल्या हृदयात निवास करत आहे, याचा अनुभव आपण घेतला पाहिजे.

‘परमात्मा श्रीराम सर्वत्र आहे’ हा संदेश आपण सर्व जनां मध्ये पसरवलाच पाहिजे. तसे न केल्यास भविष्यात या गोष्टीचे आपल्याला खूप दुःख होईल.

श्रीराम सखा असतां शिरीं ।
जो बुडे चिंतासागरीं ।
तेणें कल्पवृक्षातळीं ।
रुदन आरंभिलें ॥ १ ॥

समर्थ असतां पाठीराखा ।
चिंता किमर्थ करणें मूर्खा ।
नेणोनिया सत्संगसुखा ।
वृथा कां भ्रमसी ॥ २ ॥

आपुलाल्या दैवताचा ।
अभिमान घेती जन साचा ।
तेणें अनंत जगदीशाचा ।
विसर पडे ॥ ३ ॥

मतामतांचा गलबला ।
कोणी पुसेना कोणाला ।
जो जे मतीं सांपडला ।
तयास तें चि थोर ॥ ४ ॥

ऐसें जाणोनिया जीवें ।
जनी वाद करणें त्यागावें ।
नाहीं तरी लागेल शिणावें ।
वेर्थ बापा ॥ ५ ॥

स्थितप्रज्ञ होवोनिया ।
श्रीराम कर्ता जाणोनिया ।
शोक कारी वाद वाया ।
कासया करावावा ॥ ६ ॥


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची