Loading ...

मनाचे श्लोक - श्लोक ६०

मनाचे श्लोक - श्लोक ६० - [Manache Shlok - Shlok 60] मना राम कल्पतरु कामधेनु, निधी सार चिंतामणी काय वानूं.

मनाचे श्लोक - श्लोक ६० | Manache Shlok - Shlok 60

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक ६०, मना राम कल्पतरु कामधेनु, निधी सार चिंतामणी काय वानूं

मनाचे श्लोक - श्लोक ६०


मना राम कल्पतरु कामधेनु ।
निधी सार चिंतामणी काय वानूं ॥
जयाचेनि योगे घडे सर्व सत्ता ।
तया साम्यता कायसी कोण आतां ॥ ६० ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ६० - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


मनो रामचन्द्रो निधिः कामधेनुः
सुरद्रुर्मणिश्चिन्तितार्थप्रदश्च ।
प्रभावाद् हि यस्यैव सर्वस्य सत्ता
न तत्तुल्यतामेति कश्चिद् जगत्याम् ॥ ६० ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ६० - अर्थ


श्रीसमर्थ या श्लोकातून आपल्याला सांगू इच्छितात की, प्रभु श्रीरामचंद्र आपल्या सर्व कामना पूर्ण करणारा कल्पतरु आहे व कामधेनूही आहे. त्याचे अखंड स्मरण केल्यास तो आपल्याला सर्व दुःखातून मुक्त करतो.

श्रीराम सत्याचे प्रतीक आहे. श्रीराम परमात्म-स्वरूप असल्याकारणाने सर्व काही त्याच्याच सत्तेने चालते. त्यामुळे श्रीरामाची तुलना कोणाशीही करता येणार नाही.

श्रीराम माझा कल्पतरु ।
अथवा कामधेनु महुरु ।
इच्छाप्रदानीं आदरु ।
अत्यंत ज्यातें ॥ १ ॥

अथवा कुबेराचे नव निधी ।
चिंतामणी दे समृद्धी ।
तेवी सद्गुरु उदारधी ।
कोड पुरवी परोपरी ॥ २ ॥

परी हे ही दृष्टान्त ।
केवी श्रीरामी शोभत ।
दृष्टान्तवस्तूंसी वस्तुत्व ।
ज्याचिया सामर्थ्ये ॥ ३ ॥

कामधेनु कल्पतरु ।
निधी चिंतामणी सारु ।
रामसत्तामात्रें थोरु ।
असतां परी ॥ ४ ॥

कैसी रामी बरोबरी ।
करितीं बापुडीं भिकारीं ।
रामसत्ता अनुपम्य खरी ।
भुवनत्रयी ॥ ५ ॥

तस्तात् शरण जावें श्रीरामाला ।
सकल मुनिजनविश्रामाला ।
देवबंदविमोचकाला ।
अनन्य भावे ॥ ६ ॥

देवावेगळें कोणी नाही ।
ऐसें बोलती सर्व हि ।
परंतु त्यांची निष्ठा कांही ।
तैसी च नसे ॥ ७ ॥

ह्मणोनि ऐसें न करावें ।
सख्य तरी खरें चि करावें ।
अंतरीं सदृढ धरावें परमेश्वरासी ॥ ८ ॥


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची