Loading ...

मनाचे श्लोक - श्लोक ५९

मनाचे श्लोक - श्लोक ५९ - [Manache Shlok - Shlok 59] मना कल्पना कल्पितां कल्पकोटी, नव्हे रे नव्हे सर्वथा रामभेटी.

मनाचे श्लोक - श्लोक ५९ | Manache Shlok - Shlok 59

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक ५९, मना कल्पना कल्पितां कल्पकोटी, नव्हे रे नव्हे सर्वथा रामभेटी

मनाचे श्लोक - श्लोक ५९


मना कल्पना कल्पितां कल्पकोटी ।
नव्हे रे नव्हे सर्वथा रामभेटी ॥
मनीं कामना राम नाही जयाला ।
अती आदरे प्रीती नाही तयाला ॥ ५९ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ५९ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


जनः कल्पनां कल्पयन् कोटिकल्पं
समभ्येति रामं प्रभुं नैव नैव ।
धृतश्चेतसा येन कामो न रामः
कुतस्तस्य रामे तु सुप्रीतियोगः ॥ ५९ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ५९ - अर्थ


श्रीसमर्थ या श्लोकातून आपल्याला कळकळीने समजवीत आहेत की, हे मना, कल्पकोटी कल्पना केल्या तरी काय होणार आहे रे? नुसती कल्पना करून श्रीरामचरणांचे दर्शन कधी झाले आहे काय? कल्पनारूपी कामनेचा संपूर्ण क्षय झाल्यावाचून श्रीराम भेटणार नाहीच हे निश्चित होय!

आपुले अनुभवें ।
कल्पनेसी मोडावें ।
मग सुकाळी पडावें ।
अनुभवाचे ॥

निर्विकल्पास कल्पावें ।
कल्पना मोडे स्वभावें ।
मग नसोनि असावें ।
कल्पकोटी ॥

जयाला मनी कामना, तयाला राम नाही व अती आदरें (श्रीरामी) प्रीति नाही. ज्याला श्रीरामावाचून अन्य कामना असते, त्याला श्रीरामदर्शन होत नाही व त्याची श्रीरामाच्या ठिकाणी अनन्य प्रीतिही नसते.


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची