Loading ...

मनाचे श्लोक - श्लोक ५८

मनाचे श्लोक - श्लोक ५८ - [Manache Shlok - Shlok 58] नको वासना वीषयीं वृत्तिरुपें, पदार्थी जडे कामना पूर्वपापें.

मनाचे श्लोक - श्लोक ५८ | Manache Shlok - Shlok 58

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक ५८, नको वासना वीषयीं वृत्तिरुपें, पदार्थी जडे कामना पूर्वपापें

मनाचे श्लोक - श्लोक ५८


नको वासना वीषयीं वृत्तिरुपें ।
पदार्थी जडे कामना पूर्वपापें ॥
सदा राम निष्काम चिंतीत जावा ।
मना कल्पनालेश तोहि नसावा ॥ ५८ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ५८ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


मनो माऽस्तु शब्दादिषु प्रीतियोगः
पदार्थेषु कामो भवेत् पूर्वपापैः ।
सुनिष्काम-भक्त्या प्रभुश्चिन्तनीयो
विकल्पस्य लेशोऽपि तूर्णं प्रहेयः ॥ ५८ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ५८ - अर्थ


श्रीसमर्थ आपल्या सर्वांना या श्लोकातून सांगू इच्छितात की, उदासीनता नसली तर वृत्तींचा सारा ओढा विषयांकडे असतो. तो तसा नसावा.

पण, नसावा एवढे म्हणून भागत नाही. पूर्वजन्मार्जित कर्माप्रमाणे पदार्थांच्या ठिकाणी वासना जडत जाते.

यासाठी आता तरी या जन्मात श्रीरामाचे अखंड चिंतन निष्काम बुद्धीने करत जावे.

कामनेचा लेशही नसावा, कल्पनेवाचून कामना अन्य काय आहे ? म्हणून कल्पनालेश म्हणजे कामनालेशच.

कामनेनें फळ घडे ।
निःकाम भजनें भगवंत जोडे ।
फळ भगवंता कोणीकडे ।
महादांतर ॥

नाना फळें देवापासीं ।
आणी फळ अंतरी भगवंतासी ।
याकारणें परमेश्वरासी ।
निःकाम भजावें ॥

भक्तें जें मनीं धरावें ।
तें देवें आपण चि करावें ।
तेथें वेगळें भावावें ।
नलगे कदा ॥


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची