Loading ...

मनाचे श्लोक - श्लोक ५७

मनाचे श्लोक - श्लोक ५७ - [Manache Shlok - Shlok 57] जगीं होइजे धन्य या रामनामे, क्रिया भक्ति ऊपासना नित्य नेमे.

मनाचे श्लोक - श्लोक ५७ | Manache Shlok - Shlok 57

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक ५७, जगीं होइजे धन्य या रामनामे, क्रिया भक्ति ऊपासना नित्य नेमे

मनाचे श्लोक - श्लोक ५७


जगीं होइजे धन्य या रामनामे ।
क्रिया भक्ति ऊपासना नित्य नेमे ॥
उदासीनता तत्त्वता सार आहे ।
सदा सर्वदा मोकळी वृत्ति राहे ॥ ५७ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ५७ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


हरेर्नाम-संकीर्तनोपासनाभ्यां
जनो धन्यतां एत्यजस्रं जगत्याम् ।
उदासीनता सा पदार्थेषु सारं
तया सर्वदा चित्तवृत्तेः प्रशान्तिः ॥ ५७ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ५७ - अर्थ


श्रीराम नामस्मरणाचा महिमा कळण्यासाठी श्रीश्रेष्ठांचा ‘भक्तिरहस्य’ ग्रंथ अवश्य वाचावा.

श्रीराम जय राम जय जय राम ।
अखंड जो स्मरे सप्रेम ।
तो स्वयेंचि असे पुरुषोत्तम ।
म्हणौनि राम न विसरावा ॥

नित्य नियमासंबंधाने श्रीसमर्थांचा “अंतर्भाव” हा ग्रंथ अवश्य वाचावा.

मानसपूजा जप ध्यान ।
येकाग्र करूनियां मन ।
त्रिकाळ घ्यावें दर्शन ।
मरूत्सुताचें ॥

वैराग्य, नैराश्य, उदासीनता सत्वगुणाचे लक्षण असून तीच नरजन्माची सफलता आहे. या असार संसारात सार काय ती उदासीनता आहे. या उदासीनतेमुळे सदासर्वदा वृत्ती मोकळी राहते, म्हणजे अलिप्त स्थिती प्राप्त होते. अखंड श्रीराम नामस्मरण व श्रीसद्गुरूंची पूजा, ध्यान, जप, श्रवण, मनन इत्यादि जो नित्य नियम घालून दिलेला असेल त्याचे प्रतिपालन करीत असता कसल्याही फलाची अपेक्षा न करता निरंतर निरुपाधिक स्थितीत रहावे, असा भावार्थ.


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची