Loading ...

मनाचे श्लोक २०५

मनाचे श्लोक २०५ - समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेले मनाचे श्लोक २०५. मनाची शते ऐकता दोष जाती, मतीमंद ते साधना योग्य होती [Manache Shlok 205].

मनाचे श्लोक २०५ | Manache Shlok 205

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक २०५, मनाची शते ऐकता दोष जाती, मतीमंद ते साधना योग्य होती

मनाचे श्लोक २०५


मनाची शते ऐकता दोष जाती ।
मतीमंद ते साधना योग्य होती ॥
चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी ।
म्हणे दास विश्वासत मुक्ति भोगी ॥ २०५ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक २०५ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


मनोबोधमाकर्ण्य दोषाः प्रयान्ति
जडाः साधना-योग्यतां चोपयान्ति ।
ततो ज्ञानवैराग्यसामर्थ्यलाभो
विमुक्तिस्ततो दासवाक्यप्रतीत्या ॥ २०५ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक २०५ - अर्थ


अगदी पहिला श्लोक नमनाचा आहे व या शेवटच्या श्लोकात फलश्रुती सांगितली आहे. अथपासून इतिपर्यंत हे दोनशे पाच श्लोक श्रवण केल्याने श्रोता सर्व पापांपासून मुक्त होतो, अगदी मूढ मनुष्य असला तरी आपण आता काहीतरी साधन करावे असे त्यास वाटू लागते, तसे तो साधक करू लागतो व क्रमाक्रमाने ज्ञान, वैराग्य आणि सामर्थ्य भगवान शंकराप्रमाणे (मागील श्लोक ८६ पहा) त्याच्या अंगी बाणू लागतात. शेवटी जे कोणी मुमुक्षु जन,

सद्गुरुवचन हृदंई धरी ।
तोची मोक्षाचा अधिकारी ॥

हा सिद्धांत जाणून, गुरुपदिष्ट मार्गाने अभ्यास करतील ते,

याचि जन्में येणेंची काळें ॥

जन्ममृत्यूपासून सुटून सायुज्यता मुक्ती मिळवतील.

॥ इति श्री मनाचे श्लोक टीका संपूर्ण ॥


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची