उगवला शुक्र तारा, चांदणे फुलवी पिसारा, मन्मनीच्या गाभाऱ्यात, दरवळला सखी मोगरा
उगवला शुक्र ताराचांदणे फुलवी पिसारा
मन्मनीच्या गाभाऱ्यात
दरवळला सखी मोगरा
वाट पाहुनी थकले जरी
ओढ होती अंतरी
अंतरीच्या स्पंदनाने तुज
साद दिली परोपरी
प्रश्नचिन्ह जे मजसमोर
तूच देसी गे उतरा
मन्मनीच्या गाभाऱ्यात
दरवळला सखी मोगरा!
वाटले तुज द्यावे उसने
मागण्या ते यावे दारी
काय द्यावयाचे ते
न उमजे जन्मभरी
संध्यातीरा जीवनाच्या
मार्ग सापडे मज खरा
मन्मनीच्या गाभाऱ्यात
दरवळला सखी मोगरा