मांजरीची पावलं तुझी, सारं सांगून गेली, चोर पावलांची खूण, मनी रूजून बसली
मांजरीची पावलं तुझीसारं सांगून गेली
चोर पावलांची खूण
मनी रूजून बसली
प्रेमाच्या विचारांचं गुंतवळ
सुटता सुटेना
मांजराचं डोळे मिटणं
खरंच समजेना
मांजर पावलांनीच
याचं कोड उलगडलं
मनीचं मांजर
मनातच घुटमळलं
मग याद आली
तुझ्या मांजर नख्यांची
डोळे मिटून
कानोसा घेण्याची
ओरखडा तर,
काढणार नाहीस ना!
मांजर डोळ्यांची साथ
जन्मभर देशील ना!