जगण्याची क्षमा - मराठी कविता

जगण्याची क्षमा, मराठी कविता - [Jagnyachi Kshama, Marathi Kavita] विकत मिळते, जगण्याचे छत्र, मरणंच मात्र, विनाखर्ची.

विकत मिळते, जगण्याचे छत्र, मरणंच मात्र, विनाखर्ची

विकत मिळते । जगण्याचे छत्र
मरणंच मात्र । विनाखर्ची

पाठीवर वार । डोक्यावर भारा
पोटातला सुरा । दिल्लगीत

डोळ्यांतले पाणी । डोळ्यांत आटते
काळीज पेटते । वणव्यात

वारकरी वजा । मारेकरी जमा
जगण्याची क्षमा । दिलगिरी


धोंडोपंत मानवतकर | Dhondopant Manwatkar
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कविता या विभागात लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.