Loading ...
/* Dont copy */

मनाचे श्लोक - श्लोक १९५

मनाचे श्लोक - श्लोक १९५ - [Manache Shlok - Shlok 195] बसे हृदयी देव तो जाण ऐसा, नभाचेपरी व्यापकू जाण तैसा.

मनाचे श्लोक - श्लोक १९५ | Manache Shlok - Shlok 195

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक १९५, बसे हृदयी देव तो जाण ऐसा, नभाचेपरी व्यापकू जाण तैसा

मनाचे श्लोक - श्लोक १९५


बसे हृदयी देव तो जाण ऐसा ।
नभाचेपरी व्यापकू जाण तैसा ॥
सदा संचला येत ना जात कांही ।
तयावीण कोठे रिता ठाव नाही ॥ १९५ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १९५ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


इति प्राह जानीहि देवो हि हृत्स्थो
नभोवत्सदा व्यापकोऽप्यप्रलिप्तः ।
न गच्छत्यथो नोपगच्छत्यजस्रं
ऋते तेन रिक्तं स्थलं नैव किंचित् ॥ १९५ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १९५ - अर्थ


श्रीसमर्थ सांगत आहे की,

पक्षी अंतराळीं गेला ।
भोंवेतें आकाशची तयाला ।
तैसें ब्रह्म प्राणीयांला ।
व्यापून आहे ॥

परब्रह्म तें येकलें । येकदांची सकळांसी व्यापिलें । सकळांस स्पर्शोन राहिलें । सकळां ठांई ॥

येईना जाईना ब्रह्म ।
उपजेना मरेना कदा ।
उडेना बुडेना ब्रह्म ।
सदोदितची संचले ॥

जेथें तेथें देव नाही रिता ठाव ।
ऐसा माझा भाव अंतरींचा ।
अंतरींचा देव अंतरी जोडला ।
विकल्प मोडला येकसरा ।
येकसरा जाला लाभ आकस्मात ।
ब्रह्म सदोदित सर्वा ठांई ॥

मजवेगळा रिता कांही ।
अणुभरी ठाव उरला नाहीं ।
मी सर्वात्मा सर्व देही ।
सर्वगत पाहीं सर्वदा ॥


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची