Loading ...

मनाचे श्लोक - श्लोक १९६

मनाचे श्लोक - श्लोक १९६ - [Manache Shlok - Shlok 196] नभी वावरे जा अणुरेणु काही, रिता ठाव या राघवेवीण नाही.

मनाचे श्लोक - श्लोक १९६ | Manache Shlok - Shlok 196

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक १९६, नभी वावरे जा अणुरेणु काही, रिता ठाव या राघवेवीण नाही

मनाचे श्लोक - श्लोक १९६


नभी वावरे जा अणुरेणु काही ।
रिता ठाव या राघवेवीण नाही ॥
तया पाहता पाहता तोचि जाले ।
तेथे लक्ष आलक्ष सर्वे बुडाले ॥ १९६ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १९६ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


नभोविभ्रमद्-रेणुमात्रं स्थलं नो
रघूणामधीशेन रिक्तं विभाति ।
प्रवृत्तो हि तद्दर्शने यः स तस्मिन्
लयं यात्यलक्ष्यं च लक्ष्यं च लीनम् ॥ १९६ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १९६ - अर्थ


श्रीसमर्थ सांगत आहेत की, आकाशात जे सूक्ष्म जीव वावरतात, जे एरव्ही दिसत नाहीत, पण जे एखाद्या जाळीतून घरात येणाऱ्या सूर्यकिरणप्रकाशात विशेषतः दिसतात, त्यांच्यातही श्रीराम भरलेला आहे.

जयावीण कोठें रिता ठाव नाहीं ।
तया शोधितां तोची होऊनि राहीं ।
म्हणे दास विश्वास भावें धरावा ।
खरा देव तो आदरें वोळखावा ॥

अशा त्या स्वरूपाचे दर्शन घेता घेता, आपण तदृप होऊन त्या स्वरूपाच्या ठिकाणी सर्व काही दृश्यादृश्याचा लय होतो.

जयाचा घ्यावा अनुभव ।
तोची आपण निरावेव ।
आपुला घेती अनुभव ।
विश्व जन ॥

लोभी धन साधूं गेले ।
तवं ते लोभी धनची जाले ।
मग ते भाग्यपुरुषीं भोगिले ।
सावकास ॥

तैसें देहबुद्धि सोडितां ।
साधकास जालें तत्वता ।
अनुभवाची मुख्य वार्ता ।
ते हे ऐसी ॥

हें ज्ञानदृष्टिनें पाहावें ।
पाहोन तेथेंची राहावें ।
निजध्यासें तदृप व्हावें ।
संगत्यागें ॥


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची