Loading ...

मनाचे श्लोक - श्लोक १९०

मनाचे श्लोक - श्लोक १९० - [Manache Shlok - Shlok 190] नव्हे कार्यकर्ता नव्हे सृष्टिभर्ता, पुरेहून पर्ता न लिंपे विवर्ता.

मनाचे श्लोक - श्लोक १९० | Manache Shlok - Shlok 190

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक १९०, नव्हे कार्यकर्ता नव्हे सृष्टिभर्ता, पुरेहून पर्ता न लिंपे विवर्ता

मनाचे श्लोक - श्लोक १९०


नव्हे कार्यकर्ता नव्हे सृष्टिभर्ता ।
पुरेहून पर्ता न लिंपे विवर्ता ॥
तया निर्विकल्पासि कल्पित जावे ।
परि संग सोडुनि सुखे रहावे ॥ १९० ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १९० - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


स नो कार्यकर्ता न वा सृष्टिभर्ता
परायाः परो नो विवर्तेन लिप्तः ।
स वै निर्विकल्पो विकल्प्यैव सेव्यः
परित्यज्य सङ्गं सुखं स्थेयमत्र ॥ १९० ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १९० - अर्थ


श्रीसमर्थ सांगत आहेत की, तो निर्गुण देव ब्रम्हदेवाप्रमाणे सृष्टिकर्ताही नाही आणि विष्णूप्रमाणे पालनकर्ताही नाही.

तो परेहून पर्ता आहे, परावाणीच्या पलीकडचा म्हणजे वाचातीत आहे.

परेहूनि जो पर्ता ।
परात्परची बोलिजे ।
उन्मेष ते परा वाचा ।
वाचातीत निरंजनु ॥

तो ‘विवर्ता न लिंपे’. विवर्त म्हणजे माया, भ्रम. त्याला माया स्पर्शू शकत नाही.

असा जरी तो निर्विकल्प आहे, तरी त्याची कल्पना करतच जावी, फक्त अखेरीस ती कल्पनाही शिल्लक नाही उरली म्हणजे झालं.

निर्विकल्पासी कल्पितां ।
कल्पनेची नुरे वार्ता ।
निःसंगास भेटों जातां ।
निःसंग होइजे ॥


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची